सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोलापूरमधला असल्याचा बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन आजोबा कशाचीही तमा न बाळगात रस्त्यावर एका मिरवणूकीत डान्स करत आहेत.आजोबांचा डान्स पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. आणि सोबत मित्र असताना तर आणखीनच उत्साह, दोघांमधली जुगलबंदी पाहून आजूबाजूचेही टाळ्या वाजवत आहेत.
या व्हिडीओला “नाद पाहिजे ओ” असं च्या कॅप्शन देण्यात आलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> खेळण्यातील बंदूक समजून तरुणानं झाडली गोळी; स्वत:चंच बोट…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर solapur_sound_line_andtop या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.