snake viral video: सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यावर रातोरात एखादी गोष्ट प्रचंड व्हायरल होते आणि हे अपलोड करणाऱ्याला तितकीच प्रसिद्धीही मिळते. यावर येणारे काही व्हिडिओ लोकांना अक्षरशः हैराण करतात. फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे व्हिडिओ समोर येत असतात ज्यावर विश्वास बसणंही कठीण असतं. असाच आणखी एक व्हिडिओ काही दिवसांपासून फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन सापांचा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिला नसेल.सापांच्या भांडणाचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. आताही असाच एक भन्नाट व्हीडिओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कधी अशा काही विचित्र घटना ऐकू येतात की त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. पण त्या गोष्टी खऱ्या असतात. आता हेच पाहा नाही. एक अशी घटना समोर आली आहे. तुम्ही कधी सापानंच सापावर हल्ला केल्याचं एकलंय का? नाही ना. मात्र आता समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन सापांमध्ये लढाई सुरु असल्याचं पाहायला मिळातंय. भांडताना या सापांनी एकमेकांना पूर्ण गुंडाळले आहे. हॉटेलच्या बाहेर हे सगळं सुरु आहे. लोकही हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – आजीचा नादखुळा स्टंट! थक्क करणारे स्केटींग…पण सत्य समोर येताच नेटकरी मात्र नाराज

 सोशल मीडियावर असे व्हिडिओ खूप पाहायला मिळतात आणि अशा व्हिडिओंना भरपूर व्ह्यूज मिळतात. हा व्हिडिओ एकाच वेळी अनेक लोकांचे मनोरंजन तर करतोच, शिवाय धडाही शिकवतो. कुठलाही प्राणी आपल्या वर्चस्वासाठी लढतो आणि जिवंत राहण्यासाठीही लढत असतो. सोशल मीडियावर या सापांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two snakes are seen fighting by hugging each other video goes viral on social media srk
Show comments