Snakes Viral Video : सापाचे नाव ऐकले तरी भल्याभल्यांनाही घाम फुटतो. भारतात सापाच्या विषारी आणि बिनविषारी अशा अनेक प्रजाती आढळून येतात. प्रत्येक सापांची रचना वेगवेगळी असते, ज्यावरून साप आक्रमक आहे की शांत हे ठरवले जाते. सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या सापांच्या जोडीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकाच रंगाचे दोन साप पाण्यातून सरपटत जाताना दिसत आहेत. या सापांचा रंग पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन साप पाण्यातून सरपटत जाताना दिसत आहेत. दोन्ही सापांचा रंग तंतोतंत रस्त्यावरील दुभाजकासारखाच आहे. त्यांच्या अंगावर रस्त्यावरील दुभाजकांना जशा पिवळ्या आणि काळ्या अशा उभ्या पट्ट्या असतात अगदी तशाच पट्ट्या आहेत. यावेळी कोणीतरी या सापांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Civil Expert | Comment your Opinion ?? Save & share ? #construction #civil #architecture #civilengineer #engineer #building #civilconstruction… | Instagram

@Civil Expert नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला, ज्यावर लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, हा एक बँडेड क्रेट जातीचा साप आहे, जो अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. हे फक्त इतर साप खातात, ज्यांना सामान्यतः “अहिराज” नावानेदेखील ओळखतात.

हेही वाचा – “एक १५० ची तर दुसरी २०० ची…” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले, VIDEO पाहून म्हणाले…

“हे साप सेम डिव्हायडरसारखे दिसतायत”, युजरची कमेंट

एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, हे सेम डिव्हायडरसारखे दिसतायत, जे त्वरित जीव घेऊ शकतात. दुसऱ्याने लिहिले की, हा साप जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे. तिसऱ्याने लिहिले की, डिव्हायडरचा रंग या सापावरून घेण्यात आला आहे, कारण काळा आणि पिवळा रंग सावधगिरीचे निशाण मानले जाते. आणखी एकाने लिहिले की, हा साप इतका धोकादायक आहे की, याने दंश केल्यानंतर विषविरोधी इंजेक्शनही काम करणार नाही.

आणखी एका युजरने लिहिले की, भावा या सापांना कोणी डिव्हायडरच्या रंगाचा रंग दिला आहे की हा नैसर्गिक रंग आहे? शेवटी एका युजरने लिहिले की, या सापापासून जमेल तितके दूर राहा. हा अतिशय धोकादायक साप आहे. एकदा चावल्यानंतर काही वेळातच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

Story img Loader