Viral video : आपल्या देशाची सेवा करणाऱ्या भारतीय सैन्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते घर आई वडील, पत्नी मुलांपासून दूर राहून देशासाठी सीमेवर लढतात. आपला आनंदाने आणि सुरक्षित रित्या जगावे यासाठी ते सीमेवर रात्रंदिवस झटतात. त्यांचे आभार मानावे, तितके कमी आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची नोकरी ही देशातील सर्वात उच्च स्थानी असलेली नोकरी आहे. दरवर्षी हजारो तरुण मंडळी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाच आईचे दोन मुले म्हणजे दोघे भाऊ एकाच वेळी सैन्यात रूजू झाले. हा भावनिक व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. (two sons of a mother joined the army together emotional video goes viral on social media)

हेही वाचा : ‘बाबांशिवाय अपूर्ण…’ वाजत, गाजत नाही तर अशा प्रकारे आली नवरी मंडपात; Viral Video पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी

दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन भारतीय सैनिक दिसेल. जे त्यांच्या आईवडिलांजवळ जातात आणि त्यांना सॅल्युट करतात. मुलांना सॅल्युट करताना पाहून आईवडील सुद्धा सॅल्युट करतात. त्यानंतर मुले त्यांच्या डोक्यावरील कॅप त्यांच्या आईवडीलांना घालून देतात. त्यानंतर दोघेही मुले आईवडिलांबरोबर फोटो काढतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “एकाच आईचे दोन मुलं एकाच वेळी मायभुमीच्या सेवेत रुजू झाले”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Zomato Delivery Boy: “हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाही?” डिलीव्हरी बॉयला सांताक्लॉजचे कपडे काढायला लावले; Video व्हायरल!

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई-वडिलांना याशिवाय दुसरा कोणताच मोठा आनंद आयुष्यात झाला नसेल !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान भारत माता की जय अभिनंदन खुप खुप शुभेच्छा ” तर एका युजरने लिहिलेय, “वा रे भावांनो, तुम्ही खरंच आज सर्वांची मने जिंकली. त्या आई बाबांना अभिमान वाटत असेल ” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम आहे तूम्हा दोन्ही भावांना” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader