चेन्नईच्या तारामणीत एक भीषण अपघाता घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुण दुचाकीवरून भरधाव वेगानं जात असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी दुभाजकाल धडकली. प्रती तास ११४ किमीच्या वेगानं दुचाकी चालवणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात त्यांनी लावलेल्या हल्मेट कॅमेरात कैद झाला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. प्रवीण (१९) आणि हरी (१७) अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत.
नेमकं काय घडलं?
चेन्नईच्या तारामणी येथील रस्त्यावर प्रवीण आणि हरी दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होते. त्याचदरम्यान रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ त्यांच्या हेल्मेट कॅमेरात कैद झाला. प्रवीण महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तर हरीने बारावीचं शिक्षण नुकतंच पूर्ण केलं होतं.
इथे पाहा व्हिडीओ
प्रवीणच्या पालकांनी काही महिन्यांपूर्वी त्याला दुचाकी खरेदी करुन दिली होती. पण प्रवीणकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नव्हता. अपघात झाल्यानंतर प्रवीण आणि हरीला रोयापीथा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.