Viral video: एका ट्रॅकवर जर दोन ट्रेन समोर आल्या तर काय होईल? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी ट्रेन हा सर्वात चांगला ऑप्शन मानतात. देशभरात दररोज १२००० ट्रेन धावतात. यामध्ये मालगाडीचा समावेश केला तर ही संख्या २३००० पेक्षा जास्त होईल. चोवीस तास एवढ्या मोठ्या संख्येत ट्रॅक्सवर ट्रेन धावत असतात. एका एका ट्रॅकवर ट्रेन थोड्या थोड्या अंतरावर धावत असतात. दरम्यान सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन ट्रेन एकाच रुळावर एकाच वेळी आल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही दर्घटना घडली नाही मात्र काहीवेळासाठी प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन ट्रेन समोरामोर उभ्या आहेत. अनेकांनी हे पाहून रुळावर उड्या मारल्या. दोन ट्रेन अगदी थोड्याच अंतावर एकाच रुळावर समोरासमोर उभ्या आहेत. हा गोंधळ कशामुळे आणि कसा झाला याबाबत अजूनही ठोस माहिती मिळाली नाहीये. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्याने काही वेळेसाठी गोंधळ उडाला. दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांना समोर उभी असलेली रेल्वे दिसल्याने त्यांच्या काळजाचा ठोका उडाला. काय होतेय कोणालाच कळत नव्हते. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bike rider accident on Ghodbunder road thane
अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात
Indigo Flight Video Viral
धक्कादायक! विमान हवेत जाताच लोक बेशुद्ध झाले; इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Crime of theft, employee Spice Jet Airlines,
स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा
broken footboard on the Udupi to Karkala KSRTC bus how to board the bus Watch Viral Video
‘बाई…हा काय प्रकार!’ बसच्या तुटक्या पायऱ्या पाहून काळजात भरेल धडकी, बसमध्ये चढायचे कसे? पाहा Viral Video
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Gold Heist Caught On CCTV: 5 Masked & Armed Robbers Loot Jewellery Worth Crores From Store In UP's Sultanpur video
ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं कोटींचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पोटासाठी चिमुकल्याचा संघर्ष! एकीकडे अभ्यास दुसरीकडे चुलीवरची भाकरी; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

@saurabhyatra या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोको पायलटने समजूतदारपणा दाखवत ट्रेन थांबवली आणि मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. त्याचवेळी त्याच रुळावरून ट्रेन जात असल्याचे पाहून ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळाच्या बाजूला पळू लागले.