Metro fight video viral : खरं तर मेट्रोची निर्मिती लोकांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी करण्यात आली आहे. पण गेल्या काही काळात या मेट्रोमध्ये प्रवासासोबत भलतंच काहीतरी घडताना दिसतंय. हे सर्व कमी होतं म्हणून की काय आता थेट मेट्रोचा वापर भांडण, रोमान्स करण्यासाठी केला जातो. इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दोन पुरुषांमध्ये चालू मेट्रोमध्ये तुफान हाणामारी झाली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात “बाईईई हा काय प्रकार”

आतापर्यंत तुम्ही मुंबई मेट्रोमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक मेट्रोमधील दोन पुरुषांमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या कोचमध्ये दोन पुरुष प्रवाशांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होतो. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर हात उचलत मारामारी करू लागतात. मेट्रोतील गर्दीत धक्काबुक्की झाली, यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला असावा आणि शेवटी हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला.

Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त, आजी लाजल्या अन्… पाहा Viral Video
Woman in Andhra orders appliances and receives dead body with a letter demanding1 crore 3 lakh
भयानक! महिलेने ऑनलाईन मागवलं घरगुती सामान; मात्र बॉक्स…
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Fact Check Mosque Set On Fire In India No Viral Video Is real from Indonesia
भारतातील एका मशिदीला लावण्यात आली आग? विझवण्यासाठी लोकांची पळापळ; व्हिडीओ नेमका कुठला? वाचा सत्य घटना
Should you use hashtags on X Elon Musk
‘X’ वर हॅशटॅग वापरावे का? एलॉन मस्कने दिले उत्तर
Viral video of a man stealing sugarcane from a sugarcane field and taking it off the train after stopping on the train is currently going viral
“अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा तरी विचार करा” ट्रेन थांबताच प्रवाशांनी ऊसाच्या शेतात काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका
students performance on Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal song
मोठ्यांना जमले नाही ते चिमुकल्यांनी करून दाखवले ! ‘या’ गाण्यावर आतापर्यंत केलेला बेस्ट डान्स; Viral Video पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये दोन पुरुष एकमेकांसोबत भांडण करतायत. यांची खडाजंगी आता व्हायरल होतीये. हे दोघे भांडत असताना बाकी लोकं मध्यस्थी करून भांडण मिटवायचा प्रयत्न करतात. हे दोघे अगदी मारामारीपर्यंत जाऊन पोहचतात. एवढ्या गर्दीतही हे दोघे आक्रमकपणे एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. हे दृश्य अनेकांना नवीन नाही, मेट्रोमध्ये लोकलमध्ये लोक बऱ्याच कारणांनी एकमेकांशी भांडत असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लग्नासाठी काय अपेक्षा? कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरुन हसाल मंडळी; VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही मारामारी नेमकी का सुरू झाली? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नेटकरी मात्र व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, आज लोक कोणाचा एक शब्दही सहन करून घेत नाहीत. मग ते एकमेकांचा जीव घेण्यासाठीही ते मागे-पुढे पाहत नाहीत. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने आनंद घेत लिहिले की, मेट्रोला कुस्तीचा आखाडा घोषित करावे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ही परिस्थिती दिल्ली मेट्रोसारखी आहे. आणखी एकाने लिहिले की, “बाईईई हा काय प्रकार”

Story img Loader