Metro fight video viral : खरं तर मेट्रोची निर्मिती लोकांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी करण्यात आली आहे. पण गेल्या काही काळात या मेट्रोमध्ये प्रवासासोबत भलतंच काहीतरी घडताना दिसतंय. हे सर्व कमी होतं म्हणून की काय आता थेट मेट्रोचा वापर भांडण, रोमान्स करण्यासाठी केला जातो. इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दोन पुरुषांमध्ये चालू मेट्रोमध्ये तुफान हाणामारी झाली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात “बाईईई हा काय प्रकार”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत तुम्ही मुंबई मेट्रोमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक मेट्रोमधील दोन पुरुषांमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या कोचमध्ये दोन पुरुष प्रवाशांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होतो. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर हात उचलत मारामारी करू लागतात. मेट्रोतील गर्दीत धक्काबुक्की झाली, यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला असावा आणि शेवटी हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये दोन पुरुष एकमेकांसोबत भांडण करतायत. यांची खडाजंगी आता व्हायरल होतीये. हे दोघे भांडत असताना बाकी लोकं मध्यस्थी करून भांडण मिटवायचा प्रयत्न करतात. हे दोघे अगदी मारामारीपर्यंत जाऊन पोहचतात. एवढ्या गर्दीतही हे दोघे आक्रमकपणे एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. हे दृश्य अनेकांना नवीन नाही, मेट्रोमध्ये लोकलमध्ये लोक बऱ्याच कारणांनी एकमेकांशी भांडत असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लग्नासाठी काय अपेक्षा? कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरुन हसाल मंडळी; VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही मारामारी नेमकी का सुरू झाली? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नेटकरी मात्र व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, आज लोक कोणाचा एक शब्दही सहन करून घेत नाहीत. मग ते एकमेकांचा जीव घेण्यासाठीही ते मागे-पुढे पाहत नाहीत. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने आनंद घेत लिहिले की, मेट्रोला कुस्तीचा आखाडा घोषित करावे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ही परिस्थिती दिल्ली मेट्रोसारखी आहे. आणखी एकाने लिहिले की, “बाईईई हा काय प्रकार”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two uncles inside kolkata metro over push and shove fight video viral on social media srk