Viral Video : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट हा एक घाटरस्ता आहे. या घाटाच्या सभोवताली निसर्गरम्य धबधबे, झरे आणि तलाव आहे. पावसाळ्यात येथे लोकांची भयंकर गर्दी दिसून येते. पाण्याचा आनंद लुटण्यासाठी लोक येथे तुफान गर्दी करतात. सध्या पावसाळा सुरू आहे. वीकेंडला अनेक लोक ताम्हिणी घाट जाण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही ताम्हिणी घाटात जायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ताम्हिणी घाटात जाताना वाहने हळूवार चालवा. घाटाचा रस्ता नागमोडी असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन चारचाकी गाड्यांची टक्कर झालेली दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन चारचाकी गाड्या दिसतील. या दोन्ही गाड्यांची टक्कर झालेली दिसत आहे. थोडा फार पाऊस सुरू आहे. काही लोक या गाड्यांच्या शेजारी उभे आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण खाली बसला आहे आणि त्यानंतर तो उठतो. कुणाला गंभीर दुखापत झाली नाही पण गाडीचे थोडे फार नुकसान झालेले दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “ताम्हिणी घाट, पुणे. रस्त्यावर कधी कधी अनपेक्षित आव्हाने येतात. विशेषत: पावसाळ्यात वळणांवर सावध राहा आणि सुरक्षित गाडी चालवा.”

हेही वाचा : “तौबा तौबा” गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स ; गॉगल लावला, एकसारख्या साड्या नेसल्या अन्… पाहा VIRAL VIDEO तून ‘त्यांचा’ डान्स

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुण्यात पुन्हा अपघात! भरधाव वेगाने येणारी कार दुभाजक तोडून गरवारे सर्कलवरुन खाली कोसळली, Video Viral

pcmc_kar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पावसाळ्यात वळणांवर सावध रहा आणि सुरक्षित गाडी चालवा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चूक टाटा नेक्सनची दिसत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हल्ली पिवळ्या नंबरप्लेटच्या गाड्यांचे अपघात वाढलेले दिसत आहे.” या व्हिडीओवर आणखी एका युजरने लिहिलेय, “हा अपघात मी समोरून पाहिला आहे, या अपघातात टाटा नेक्सन कारच्या चालकाची चूक होती आणि एक महिला चालक होती.”

काही दिवसांपूर्वी ताम्हिणी घाटातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. घाटातील रस्त्यावरून ही कार थेट रस्ता सोडून जंगलात गेली होती. १ जुलैला घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ त्यावेळी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.