सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीना या दोघांची उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. तसंच केंद्रीय यंत्रणांनाही या दोघांची चौकशी केली आहे. चौकशीच्या दरम्यान सीमा हैदर गुप्तहेर असल्याचे किंवा त्याच्याशी संबंधित काही पुरावे आढळलेले नाहीत. आता एटीएस त्यांचा अहवाल गृह विभागाला पाठवणार आहे. यानंतर सीमा हैदर आणि तिच्या चार मुलांना पाकिस्तानला पाठवायचं की नाही? याचा निर्णय गृह विभागातर्फे घेतला जाईल. लखनऊचे एसएसपी अभिषेक सिंह यांच्या पथकाने चौकशी पूर्ण केली आहे. तसंच महत्त्वाच्या गोष्टी तिच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

सीमाकडे व्हिजा नव्हता

पाकिस्तानातून भारतात येण्याकरता सीमाकडे कोणताही व्हिजा नव्हता. नेपाळमार्गे ती अवैधरित्या भारतात आली आहे. त्यामुळे सीमेवरील पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तपासणी न करता ती भारतात कशी आली, हे शोधण्यासाठी गुप्तचर संस्थेने एसएसबीकडून (Sashastra Seema Bal) अहवाल मागवला आहे. तसंच, युपी पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे. कारण, ती उत्तर प्रदेशच्या सीमेवरून भारतात आली आणि ती बरेच दिवस आपल्या जोडीदारासोबत अवैधरित्या राहत होती.

हे पण वाचा- “आमचा घटस्फोट…” सीमा खोटं बोलतेय, गुलाम हैदरने मुलाखतीदरम्यान पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला…

उत्तर प्रदेश पोलीस विभागाचे विशेष डीजी प्रशांत कुमार यांनी सीमा हैदर आणि सचिन यांच्याशी संबंधित माहिती दिली आहे. सीमाकडे दोन व्हिडीओ कॅसेट, चार मोबाईल फोन आणि पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट मिळाले आहेत. एटीएसकडून हे जप्त करण्यात आलं आहे. एक असा पासपोर्ट आहे ज्यावर आधार क्रमांक आणि नाव नाही. या पासपोर्ट प्रकरणाचीही चौकशी सुरु आहे.

सीमा आणि सचिन कसे भेटले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा हैदर आणि सचिन मीना ऑनलाइन गेम PUBG च्या माध्यमातून २०२० मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर १५ दिवसांतच या दोघांनी एकमेकांचे नंबर एकमेकांना शेअर केले. दोघांमध्ये What’s App वरुन बातचीत सुरु झाली होती.

हे पण वाचा- VIDEO: “हा पाकिस्तान नाही भारत आहे” सीमा हैदरचा बंद खोलीतील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

१० मार्च २०२३ ला पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवरुन सीमा शारजाहला आली होती. त्यानंतर नेपाळच्या काठमांडू विमानतळावर पोहचली. १५ दिवसाच्या टुरिस्ट व्हिजावर ती निघाली होती. १७ मार्चला नेपाळ मार्गेच ती कराची गेली. ग्रेटर नोएडामध्ये राहणारा तिचा प्रियकर सचिन मीना ८ मार्च २०२३ ला परी चौक गौतमबुद्धनगर या ठिकाणाहून गोरखपूरला पोहचाल होता. त्यानंतर काठमांडू या ठिकाणी गेला होता. १० मार्चच्या सकाळी तो काठमांडूला पोहचला. यानंतर सीमा आणि सचिन न्यू विनायक हॉटेलच्या एका रुममध्ये एकत्र राहिले होते.

सीमा हैदर म्हणते मी गुप्तहेर नाही

सचिन आणि सीमाचं हे प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर सीमावर गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘इंडिया टुडे’शी बोलताना पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने ती गुप्तहेर असल्याचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, “असं काहीही नाही, अखेर सत्य बाहेर येईल. शिवाय असे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आली असते.” सीमाला तिच्या इंग्रजी बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, “मी फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करून कोणीही हे करू शकते. मला इंग्रजीचे काही शब्दही बोलता येत नाहीत आणि मला संगणक कसा चालवायचा हे देखील माहित नाही.”

Story img Loader