Women Fight in Bus: महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अगदी क्षुल्लक कारणावरून कधी बसमध्ये, कधी ट्रेनमध्ये, तर कधी रस्त्यावरही एकमेकींशी कचाकचा भांडतानाच्या घटना पाहायला मिळतात. नुकताच महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे चालत्या बसमध्ये दोन महिला एकमेकींशी भांडत आहेत. यावेळी त्या एकमेकींना शिवीगाळ करत चक्क चपलेने मारतानाही दिसत आहेत. या भांडणामागे कारणही इतके क्षुल्लक होते की, जाणून तुम्हालाही हसायला येईल. बेंगळुरूमधील बीएमटीसी बसमधील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बेंगळुरूमधील बीएमटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवाशांमध्ये खिडकी सरकवण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. खिडकीवरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही महिला एकमेकींना चक्क चप्पलने मारहाण करत आहेत. काही सेकंद त्या एकमेकींना चप्पलने मारहाण करतात. यावेळी बसमध्ये उपस्थित प्रवासी महिलांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, पण त्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला उभी आहे तर दुसरी महिला सीटवर बसून भांडताना दिसत आहे. दोघीही एकमेकांना शिवीगाळ करत आहेत. यावेळी उभी असलेली महिला आधी चप्पलने मारण्यास सुरुवात करते, त्यानंतर सीटवर बसलेली महिलाही पायातील चप्पल काढून तिला मारू लागते. यादरम्यान बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मोफत बस प्रवासाचा महिला चांगल्याप्रकारे फायदा घेत आहेत; तर काहींनी ही अशाप्रकारची भांडणं फक्त बेंगळुरूमध्येच का होतात? असा सवाल केला आहे.