सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणही जास्त असतं. अशा अपघातांत माणसं एक तर गंभीर जखमी होतात किंवा त्यांना मृत्यूला तरी सामोरं जावं लागतं. अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य संपवू शकते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडली आहे. ज्यात थोड्याशा मजेसाठी दोन महिलांनी स्वत:ला मृत्यूच्या दारात ढकललं. नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपाळ्यावर झोका घेणं पडलं भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये दोन महिला झोपाळ्यावर झोका घेण्याचा आनंद घेताना दिसतायत. पण हा आनंद त्यांच्या जीवावरदेखील बेतू शकतो याची त्यांनी कल्पनादेखील केली नसेल.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका दरीच्या कडेवर असलेल्या झोपाळ्यावर दोन महिला झोका घेताना दिसत आहे. तिथे असलेला एक माणूस त्यांना जोर जोरात झोके देताना दिसतोय. तिथे अजून काही माणसंदेखील जमलेली दिसतायत. जोरजोरात झोका देत असताना अचानक त्या महिलांचा तोल जातो आणि त्या दरीत कोसळतात. त्यापुढे नेमकं काय घडलं हे कळू शकलं नाही. तसंच ही घटना नेमकी कुठे घडली हेदेखील अद्याप कळू शकलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @pratahkal.live या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “टेकडीवर झोके घेणे महागात पडले, दोन महिला दरीत पडल्या…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सेफ्टी बेल्टशिवाय हा स्टंट का केला गेला?” तर दुसऱ्याने “अशाप्रकारे झोपाळ्याला कोण धक्का देतं” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “महिलांच्या धाडसाला सलाम”