Viral Video : सोशल मीडियावर कधी मेट्रोमधील तर कधी बसमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एका बसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन महिला एका सीटसाठी जोरदार भांडण करताना दिसत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन महिला सीटवरुन भांडताना दिसत आहे. त्यापैकी एक महिला दुसऱ्या महिलेचे केस ओढत आहे. त्यांचे भांडण मिटवण्यासाठी एक व्यक्तीसुद्धा मध्यस्थी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे पण त्यानंतर महिला आणि त्या व्यक्तीमध्येही शाब्दीक बाचाबाची होताना दिसते. बसमध्ये बसलेले बाकी प्रवासी शांतपणे पाहताना दिसत आहे. काही प्रवासी घटनेचा व्हिडीओही शुट करताना दिसत आहे. त्यांच्या भाषेवरुन हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचा अंदाज लावला जात आहे

हेही वाचा : OMG! माकड चक्क कॅमेरा हाताळतोय; व्हिडीओ पाहून व्हाल शॉक, नेटकरी म्हणाले, “हा व्हिडीओ…”

@prajavani या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “तुमकर येथे केएसआरटीसी बसमध्ये सीटच्या वादातून महिलांमध्ये हाणामारी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजर लिहिले, “बापरे, हे खूप चुकीचे आहे” तर एका युजरने व्हिडीओवर रोष व्यक्त करत लिहिले आहे, “ही कोणती नारीशक्ती?” आणखी एका युजरने लिहिले, “सार्वजानिक ठिकाणी असे वागणे खूप चुकीचे आहे”