Delhi Sarojini Market Fight Video : सोशल मीडियावर लहानसहान कारणांवरून झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी, लाठ्या-काठ्यांनी तर कधी हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण करताना दिसतात. यातील मारामारीचे व्हिडीओ फारच भयानक असतात, तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरणं अवघड होतं. सध्या सोशल मीडियावर दोन महिलांच्या मारामारीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; कारण यातील महिलांच्या भांडणाचे कारण ऐकून तुम्हाला हसून हसून वेडं व्हायला होईल.
तुमच्यापैकी अनेकांना माहितेय, पुरुषांपेक्षा महिलांना कपडे खरेदीचं फार वेड असतं. तुम्ही मुंबई, दिल्लीतील अनेक कपड्यांच्या मार्केटमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला पुरुषांपेक्षा महिलांचीच गर्दी पाहायला मिळेल. अनेकदा त्यांच्याच कपडे खरेदी करण्यावरून वाद होतात, अनेकदा या वादाचे रुपांतर हाणामारीपर्यंत जाते. असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये घडला आहे, जिथे एका ड्रेससाठी चक्क दोन महिलांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर काहीवेळातच हाणामारीपर्यंत पोहोचले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
एकीने दुसरीच्या जोरात कानाखाली मारली अन्…
एकच ड्रेस दोघींना आवडल्याने दोन्ही महिला एकमेकांशी जोरजोरात भांडू लागल्या. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं, यानंतर दोघींनी एकमेकांच्या कानशिलात लगावली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका दुकानात दोन महिलांना एकच ड्रेस खूप आवडला. यावेळी तो मिळवण्यासाठी दोघींमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी एकीने दुसरीच्या जोरात कानाखाली मारली, यावर संतापलेल्या दुसऱ्या महिलेनेही तिला प्रत्युत्तरात कानाखाली लगावली, यानंतर तिला कपड्यांच्या स्टॅलवर ढकलून दिलं. यावेळी एक महिला त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे आली, मात्र काही वेळाने तिनेही मारामारीत हात धुवून घेतले. दोघींनी मिळून त्या महिलेचे केस ओढले, मारलं, नंतर तिच्या हातातून ड्रेस ओढून घेण्याचा प्रयत्न केला. आणखी एका महिलेने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिघी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. यावेळी दोघींची मारामारी पाहण्यासाठी आजूबाजूला बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर युजर्सदेखील भन्नाट भन्नाट कमेंट्स करतायत. एकाने लिहिले की, मॉर्डन कपडे घातले तरी हसण्यासारखं काम करतायत. कपडे चांगले पण मानसिकता मात्र बदललेली नाही, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्याने लिहिले की, कपड्यांच्या बाबतीत तडजोड नाही.