सोशल मीडियावर आपल्याला बरीच नवनवीन कलाकार मंडळी पाहायला मिळते. आपल्याकडे असणाऱ्या चित्रकलेपासून ते नाच-गाण्यापर्यंत अनेक भन्नाट गोष्टींचे व्हिडीओ वापरकर्ते आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असतात आणि अनेकदा ते व्हायरलही होत असतात. असेच, सध्या चालत्या मेट्रोमध्ये दोन तरुण एका ऍनिमेटेड चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणे गात असल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @Arjun_Bhowmick नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मेट्रोमध्ये, अर्जुन स्वतः त्याच्या मित्रांसोबत मेट्रोच्या दोन डब्यांच्यामध्ये उभे राहून ‘आसमान को छुकर देखा’ हे सध्याचे ट्रेंडमध्ये असणारे गाणे म्हणत आहेत. अर्जुन गाणे गात असून त्याचा मित्र गिटार वाजवताना आपण पाहू शकतो. दोघे गाणे गाऊ लागल्यावर, मेट्रोमधील प्रवाश्यांच्या प्रतिक्रियासुद्धा या व्हिडिओमध्ये शूट केल्या आहेत. काहीजण त्यांच्यासोबत गुणगुणूत आहेत तर, सीटवर बसलेली लहान मुलं त्या दोघांकडे अगदी कौतुकाने त्याच्याकडे पाहत आहेत.

हेही वाचा : आधी पोळीमध्ये न्यूटेला घातले, नंतर तळून काढले अन मग…..; सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांचे याने लक्ष वेधून घेतले आहे; आणि बघता बघता यावर अनेक लाईक्स आणि प्रतिक्रियादेखील आलेल्या आहेत. काय आहेत नेटऱ्यांच्या प्रतिक्रिया पहा.

“पहिल्यांदाच आसमान को छुकर देखा हे गाणं कुणालातरी इतकं मस्त गाताना ऐकत आहे. खूपच सुंदर.असेच गात रहा.” असे चक्क दिलेर मेहंदी या गायकाने कमेंट्समध्ये लिहिले आहे. दुसऱ्याने “हा व्हिडिओ बघून, मी सुद्धा यांच्यासोबत गाऊ लागलो.” असे म्हंटले. “वाह. गाणे ऐकून अंगावर शहारे आले आहेत.” म्हणत तिसऱ्याने कौतुक केले आहे. “जर तुम्हाला ही गाणे ऐकून मजा येत नसेल तर कृपया पुढच्या स्टेशनवर उतरावे.” असे चौथ्याने म्हंटले आहे. “ही माझे आवडते गाणे आहे” अशी प्रतिक्रिया शेवटी पाचव्याने दिली आहे.

लहान मुलांसाठी बनवलेल्या, ‘रिटर्न ऑफ हनुमान’ या ऍनिमेटेड चित्रपटामधील हे गाणं असून, दिलेर मेहंदी यांनी ते गायले आहे.

@Arjun_Bhowmick ने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या गाण्याच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ४५.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two young boys singing aasman ko chukar dekha on metro video went viral on social media dha