Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्स करतानाचे तर कधी गाणी म्हणतानाचे, कधी अपघाताचे तर कधी प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सतत चर्चेत येतात. अनेकदा सोशल मीडियावर हाणामारी किंवा भांडतानाचे व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल होताना दिसून येतात. सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही पर्वा न करता लोकं बिनधास्त भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींचा तुफान राडा झाल्याची घटना दिसून येतेय. या दोन तरुणींची हाणामारी पाहून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसेल की एक दोन तरुणींमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. या दोन तरुणींबरोबर एक मुलगा सुद्धा उभा आहे. हा शाब्दिक वाद इतका विकोपाला जातो की त्या एकमेकांच्या अंगावर चढतात आणि चांगल्याच भिडतात. तेव्हा तिथे उभा असलेला मुलगा त्या दोन तरुणींना दूर करण्याचा प्रयत्न करतो पण या तरुणी त्या मुलाचे ऐकत नाही आणि एकमेकींच्या झिंज्या उपटतात.हाणामारीदरम्यान शेवटी एक तरुणी खाली पडते आणि व्हिडीओ येथेच संपतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.पण या तरुणी कोणत्या कारणावरुन भांडण करताहेत, हे अद्याप कळले नाही.
यापूर्वी सुद्धा मुलींचे किंवा तरुणींचे असेच हाणामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. अनेकदा मुली एकाच बॉयफ्रेंडसाठी भांडताना सुद्धा दिसून आल्या आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! १०० किलो वजनाचा बारबेल गळ्यावर पडला; गुदमरून तरुणाचा मृत्यू, व्हिडीओ होतोय व्हायरल

Nitesh kumar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुली शाळेत भांडताना” कॅप्शनवरुन कळते की हा व्हिडीओ एका शाळेतील आहे आणि दोन विद्यार्थीनी भांडण करताहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “मुली एकमेकींचे केस का ओढतात?” तर एका युजरने लिहिलेय,”या तरुणी का भांडण करताहेत?” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two young girls fighting at school and pull hairs shocking video goes viral ndj
Show comments