Viral Video : लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणी सर्वत्र ओळखली जाते. अनेक लावणी कलाकार सुरेख लावणी सादर करत असतात. सोशल मीडियावर लावणी सादर करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. सर्वच वयोगटातील कलाकार लावणीवर सुंदर व्हिडीओ बनवित असातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी तुफान लावणी करताना दिसत आहे. त्यांची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणी पायात घुंगरू घालून लावणी सादर करताना दिसत आहे. त्यांनी अप्रतिम लावणी सादर केली आहे. दोघींच्या लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या दोघींची लावणी पाहून तुम्हाला अस्सल लावणी कलावंत आठवतील. दोघीही तरुणी एकमेकींना टक्कर देत लावणी सादर करत आहे. काही लोकांना ही लावणी पाहून अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर मोठ्या अक्षरात लिहिलेय,”याला म्हणतात तोडा” लावणी तोडा हा एक सुंदर प्रकार आहे.
लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान आहे. अनेक तरुण मंडळी उत्साहाने लावणी सादर करताना दिसतात. पूर्वी फक्त स्त्रिया लावणी सादर करायच्या आता त्यात पुरुषांची सुद्धा संख्या वाढताना दिसत आहे.

a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : आज रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवणार, राम मंदिराच्या ट्रस्टने शेअर केले फोटो

lavanipremi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कोणाचा तोडा आवडला मग” या अकाउंटवरुन या पूर्वी सुदधा असे अनेक लावणीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.काही युजर्सनी या तरुणींची तुलना गौतमी पाटीलबरोबर केली आहे.गौतमी पाटील ही एक लोकप्रिय नृत्यांगणा आहे. एका युजरने लिहिलेय, “ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर सादर होणारा डान्स म्हणजे हे एक उदाहरण” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच छान अप्रतिम दोघी पण याला म्हणतात खरी लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “दोघी पण शेराला सव्वाशेर आहेत.तोडीस तोड” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader