Viral Video News : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर धक्का बसतो. अनेकदा सार्वजानिक ठिकाणी अशा घटना घडतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. सध्या पेट्रोल पंपावरील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील रांगेच्या वादातून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झालेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video : two young guys fight on petrol pump)
पेट्रोल पंपावर दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी ( two young guys fight on petrol pump))
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. रांगेच्या वादातून या तरुणांमध्ये हाणामारी झालेली दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे दोन्ही तरुण एकमेकांच्या अंगावर चढतात व धक्काबु्क्की करतात. यांच्या धक्काबुक्कीत एका काकाची दुचाकी सु्द्धा खाली पडते. पुढे व्हिडीओमध्ये काका सुद्धा संतापलेले दिसतात व एका तरुणाच्या अंगावर धावतात तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी धावून येतात आणि सर्वांना दूर करतात. पेंट्रोल पंपावरील लोक ही संपूर्ण हाणामारी बघताना दिसतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
युजर्सच्या प्रतिक्रिया
revangaikwad69 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर लिहिलेय, “पेट्रोल भरताना नंबरला उभे राहूनच पेट्रोल भरा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “होंडावाले बाबा खूप प्रचंड वेगाने गरम झाले आणि पहारपण सुरू केला…” तर एका युजरने लिहिलेय, “भांडण करणारे राहिले एकीकडे आणि व्हिडिओ काढणारा झाला व्हायरल..” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोकांना कशाची घाई असते कळत नाही. भांडण करत तासभर थांबतील पण असा थोडा पण दम निघत नाही गाडी चालवताना पण” या व्हिडीओवर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd