Shocking video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडतं नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते पण फोटो, रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतते.असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काहींना आपल्या ताकदीवर खूप विश्वास असतो, अहंकार असतो. ताकदीच्या जोरावर आपण काहीही करु शकतो अशा भ्रमात ते असतात. अशाच एका तरुणाचा भ्रम या समुद्रात वाहून गेला. नेमकं काय घडलं हे तुम्हीच पाहा. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे.  दोन व्यक्ती समुद्राच्या पाण्यात उतरले आहेत. मात्र तुम्ही पाहू शकता की,समुद्रात अनेक उंच लाटा येत आहेत तरी दोघ तिथेच थांबत आहे. मात्र काही वेळात एक लाट अशी येते की त्यामधील एक व्यक्ती समुद्रात येणाऱ्या लाटेमुळे पाय घसरुन पडतो.नशीब म्हणजे थोडक्यात हा बचावला जातो. हे सर्व या तरुणांनी मस्करीमध्ये घेतलं असलं तरी असं धाडस करणं चुकीचं आहे. असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीव गमवावा लागला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बुलेटच्या चाकात ओढणी अडकली, तरुणीनं ब्रेक दाबला अन्…VIDEO पाहून कळेल एक चूक किती महागात पडू शकते

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ” shaikyaseen.off”या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अशी कमेंट केलीय की, “ताकदीचा माज इतकाही बरा नाही” अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्हिडीओप्रमाणेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियामुळे अनेकदा समोर येतात.