आजकाल काही लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यासाठी कधी ते भररस्त्यात विचित्र डान्स करतात तर कधी जीवघेणे स्टंट करतात. याबाबतची अनेक उदाहरणं तुम्ही याआधी पाहिली असतील. पण कधीकधी असे जिवघेणे स्टंट करणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे पोलिसांकडून सतत असे धोकादायक स्टंट न करण्याचे आवाहन केले जाते. पण तरीही दररोज वेगवेगळे आणि धोकादायक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुण भरधाव रेल्वेत जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये, दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक तरुण धावत जातो आणि वेगात जाणारी ट्रेन पकडतो. यावेळी दुसरा तरुण ट्रेनच्या दरवाजाला लटकतो. दरम्यान दोन्ही तरुण हाताने दरवाचा पकडतात आणि पाय फलाटावर सोडतात यावेळी त्यांचे पाय ट्रेनबरोबर फरपटत जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच अनेकजण संताप व्यक्त करत दोन्ही तरुणांवर कारवाईची मागणी करत आहेत.

Video of a small stall of a milk seller in Ahmednagar is going viral
VIDEO: नगरकरांचा नादच खुळा! आप्पांनी दुधाच्या गाड्यावर लावला असा बॅनर की लोकांची होऊ लागली तुफान गर्दी
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
keto diet keto-friendly oils
केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र

हेही पाहा- संतापजनक! ४ वर्षाच्या चिमुकलीला शिक्षिकेची बेदम मारहाण, सलग ३५ थप्पड मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

तरुणांचा जीवघेणा स्टंट पाहून ट्रेनमध्ये उपस्थित प्रवासी आणि प्लॅटफॉर्मवर उभे असणारे लोकही आश्चर्यतकित झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून या ट्रेनचा वेग किती आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यामुळे थोडीशी चूक झाली असती तर या तरुणांचा अपघात होऊ शकला असता. तरुणांच्या स्टंटचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळत आहे. एका यूजरने एक्सवर (ट्विटर)वर लिहिले, “अशा मुर्खांना अटक करायला पाहिजे.” दुसऱ्याने लिहिलं, “फेमस होण्यासाठी काहीही करतात.” तर आणखी एकाने यांच्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं लिहिलं आहे.