Trending Today: अमेरिकन फूड कंपनी टायसनचे मोठ्या पदावरील एक अधिकारी दारूच्या नशेत केलेल्या अत्यंत गैर वर्तणुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. टायसन ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध कंपनी असून याच कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी रविवारी मद्यधुंद अवस्थेत एका महिलेच्या घरात घुसले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी यावेळेस आपले कपडेही जमिनीवर टाकून दिले होते. जॉन टायसन असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते टायसन कंपनीच्या संस्थापकांचे पणतू आहेत. या प्रकरणानंतर टायसन यांना पोलिसांनी अटक केली होती.
टायसन फूड्सचे ३२ वर्षीय सीएफओ जॉन यांच्याविरुद्ध अमेरिकेतील अर्कांसस येथील एका महिलेने हे आरोप लगावले आहेत. प्राप्त माहितीनुसार, जॉन टायसन हे ज्यावेळी घरात घुसले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. बेडरूमच्या खिडकीतून घरात घुसून टायसन यांनी आपले कपडे जमिनीवरच काढून टाकले होते, अशाच अवस्थेत मद्यधूंद टायसन थेट बेडवरच कोसळले व त्यांना झोप लागली. थोड्यावेळाने जेव्हा या घराची मालकीण घरी परतली. अचानक बेडरूममध्ये एक अनोळखी इसम दिसल्याने साहजिकच ही महिला गोंधळून गेली. तिने ताबडतोब पोलिसांनी याविषयी माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार टायसन यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी टायसन यांना उठवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ते एकही शब्द बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. टायसन यांनी मद्यपान केल्याची पोलिसांनीही पुष्टी केली आहे. याच परिस्थितीत टायसन यांना ताक करण्यात आली होती मात्र दुसर्या दिवशी ४१५ डॉलरचा दंड आकारून त्यांना जामीन देण्यात आला. १ डिसेंबरला टायसन यांना कोर्टात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान या एकूण प्रकरणानंतर टायसन फूड तर्फे CNN ला स्पष्टीकरण देत क्षमा मागण्यात आली आहे. टायसन यांनी आपल्या कृत्याची पूर्ण जबाबदारी घेऊन यात कंपनीचा काहीच संबंध नसल्याचे म्हंटले आहे.