भारतात ओला किंवा उबेर कॅब वापरणाऱ्या लोकांना अनेक वेळा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. तुम्हालाही ओला किंवा उबेर चालकांसोबत काही आश्चर्यकारक अनुभव आले असतील. अनेक वेळा ओला किंवा उबेर चालक तुमच्याकडे येण्यास नकार देतात, कारण तुम्हाला जिथे जायचे असते तिथे त्यांची जाण्याची इच्छा नसते. इतकंच नाही तर काही वेळा ड्रायव्हर स्वतः जाण्यास नकार देतो, मग तुम्ही त्याला राइड कॅन्सल करायला सांगता, पण तो नकार देत तुम्हालाच ती राइड कॅन्सल करायला सांगतो. अशी घटना अनेक लोकांसोबत घडली आहे.

आता एक नवीन घटना समोर आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेला जेव्हा समजले की आपला कॅब ड्रायव्हर पिकअप पॉईंटच्या दिशेने जात नाही, तेव्हा महिलेने ड्रायव्हरला विचारले की तो तिला घेण्यासाठी येत आहे का?

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

या महिलेने त्याला हिंदीत विचारले, ‘आप आ राहे हैं ना?’. यावर महिलेला आतापर्यंतचे सर्वात अनपेक्षित उत्तर मिळाले. त्याने तिला आश्वासन दिले की तो तिला नक्कीच पिक करायला येईल पण तो पराठा खात असल्याने त्याला उशीर होईल. त्या ड्रायव्हरने असेही सांगितले की त्याने फक्त अर्धा पराठा खाल्ला आहे आणि तो संपवल्यावर लगेचच तो पिक करायला येईल. महिलेच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिले, “मी शंभर टक्के येईन, मी पराठा खातोय, अर्धा बाकी आहे. मी सत्य सांगितले.”

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

या महिला प्रवाशाने त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट ट्विट केले आणि लिहिले, ‘हाच प्रामाणिकपणा मला आयुष्यात मिळेल अशी आशा आहे.’ तिने स्क्रीनशॉटमध्ये ड्रायव्हरचे नाव आणि फोटो लपवले होते. महिलेच्या या ट्विटला बरेच लाइक्स मिळाले आहेत.

Story img Loader