ऑनलाईन कॅब सेवेमुळे नागरिकांना येणे जाणे सोयिस्कर झाले आहे. मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाइन माध्यमातून वाहन बुक करता येत असल्याने आता रिक्शा, टॅक्सी पकडण्यासाठी होणारी धावपळ काही प्रमाणात कमी झाली आहे. प्रवासही माफक दरात असल्याने लोक ही सेवा अधिक वापरतात. मात्र, उबेरमधून सवारी करणे एका व्यक्तीला चांगलेच महाग पडले आहे.

न्यू यॉर्क पोस्टनुसार, उबेरची कार सेवा वापरणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाला १५ मिनिटांच्या प्रवासाठी चक्क ३२ लाख रुपयांचे बिले आले आहे. ऑलिव्हर कपलान असे या व्यक्तीचे नाव आहे. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर येथील बक्सटन इन येथे काम केल्यानंतर ऑलिव्हर यांनी उबेरची कार बुक केली होती. त्यांना विचवूड जे की एक बार आहे येथे त्यांच्या मित्रांना भेटायचे होते. हे ठिकाण केवळ ६ किलोमीटर दूर होते.

(‘या’ व्हिस्कीच्या केवळ एका शॉटची किंमत चक्क ४.७ कोटी! या कारणांमुळे महाग)

कार आल्यावर ते कारमध्ये बसले आणि चालकाने नियोजित ठिकाणी पोहोचवून दिले. हा केवळ १५ मिनिटांचा प्रवास होता. मात्र दुसऱ्या दिवशी उठल्यावर उबेरकडून आपल्याला ३२ लाख रुपयांच्या बिलाचे मेसेज आल्याचे ऑलिव्हर यांनी सांगितले. हे बिल पाहून चकित झालेल्या ऑलिव्हर यांनी नंतर उबेरच्या कस्टमर केअरला फोन केला. खात्यात आवश्यक बॅलन्स नसल्याने पैसे काढता न आल्याचे त्यांना समजले. रक्कम पाहून उबेरच्या कर्मचाऱ्याला देखील आश्चर्यच वाटले, असा दावा ऑलिव्हरने केला आहे.

यामुळे आले ३२ लाखांचे बिल

सोडण्याचे ठिकाण ऑस्ट्रेलिया झाल्याचे अभियंत्याला दिसून आले. ठिकाण बदलाची गडबड कशामुळे झाली हे समजू शकले नाही, पण मालफंक्शनमुळे मॅन्चेस्टर येथील ठिकाण बदलून ते ऑस्ट्रेलियातील विचवूड हे पार्क झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ऑलिव्हर यांच्या खात्यात बिल देण्याएवढे पैसे नसल्याने उबेरला त्यांच्या खात्यातून तेवढी रक्कम काढता आली नाही. जर तर तेवढी रक्कम असती तर ते पैसे मिळवण्यासाठी उबेरच्या मागे लागावे लागले असते. याने मला खूप त्रास झाला असता. मात्र उबेरने सर्व ठीक केले, असे ऑलिव्हर कपलान यांनी सांगितले.