Uber driver customer review: आजकाल कुठेही जाण्यासाठी अनेक लोक ऑनलाइन कॅब बुक करतात आणि त्याने प्रवास करतात, यामुळे ट्रेन किंवा बसच्या गर्दीतून न जाता अगदी आरामात प्रवास करता येतो. एका क्लिकवर अगदी ५ ते १० मिनिटांत आपल्याला ही कॅब घ्यायला येते आणि इच्छित स्थळी ड्रॉप करते. प्रवास झाल्यानंतर अनेकदा ड्रायव्हर ग्राहकाला प्रवासाचा अनुभव शेअर करण्यासाठी आणि अ‍ॅपवर त्यांना रेटिंग देऊन रिव्ह्यू लिहिण्यासाठी सांगतात. आपण अनेकदा अशा ड्रायव्हरबद्दल अनेक रिव्ह्यू वाचले असतील.

ड्रायव्हर चांगला किस करतो…

ग्राहक जेव्हा कॅबने ड्रॉप-ऑफसाठी जातात, तेव्हा ते प्रत्येक राईडसाठी रिव्ह्यू लिहित नाहीत आणि काहींनी जरी लिहिलं, तरी ते “आरामदायक राईड” किंवा “चांगली कार स्थिती” असंच काहीतरी लिहितात. पण, सध्या एका उबर ड्रायव्हरचा एक रिव्ह्यू व्हायरल होतोय, जो वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. एका X युजरने पोस्ट शेअर करत या रिव्ह्यूबद्दल सांगितलं आहे. या पोस्टमध्ये युजरने सांगितले की, एका उबर ड्रायव्हरच्या प्रोफाइलमध्ये एक रिव्ह्यू होता, ज्यात त्याला “चांगला किस करणारा” असे म्हटले होते आणि हा रिव्ह्यू एका ग्राहकाचा होता.

हेही वाचा… बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

मोहमद, जो एक उबर प्रो प्लॅटिनम ड्रायव्हर आहे आणि ज्याने कॅब सेवा प्लॅटफॉर्मसोबत १०,००० पेक्षा जास्त ट्रिप्स पूर्ण केल्या आहेत, त्याची रेटिंग पाच स्टारपेक्षा कमी होती, पण या सगळ्यात X वापरकर्त्याचं लक्ष वेधून घेतलं ते या मोहमदच्या प्रोफाईलवरील एका रिव्ह्यूनं, ज्यात “चांगला किस करणारा” असं लिहिलं होतं.

ही पोस्ट @s20_a_ या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली असून “Mohammed moving kinda crazy” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये तिने ड्रायव्हरचा रिव्ह्यू असणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा रिव्ह्यू आठ वर्ष जुना असला तरी या रिव्ह्यूने नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, त्या राईडमध्ये काय घडलं असावं की ग्राहकाने असा फीडबॅक दिलाय.

हेही वाचा… आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी

सोशल मीडियावर या रिव्ह्यूचा स्क्रिनशॉट व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “चांगल्या रिव्ह्यूसाठी काहीही,” असं एकाने लिहिलं आणि त्याने असा अंदाज लावला की, कदाचित ग्राहकाच्या मागणीवर त्याने किस केलं असावं. तर दुसऱ्याने “आठ वर्षांपूर्वी त्याने असं काही केलं, विचार करा तो आता काय करत असेल”, अशी प्रतिक्रिया दिली.

Story img Loader