आजकाल अनेक लोक उबर आणि ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण रिक्षा किंवा इतर वाहनांच्या तुलनेत ओला-उबरने प्रवास करणे थोडे सोपे असते. कारण तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा या कार ऑनलाइन बुकिंग करु शकता आणि तुमच्या वेळेनुसार त्या तुम्हाला घ्यायलाही येतात. उबर आणि ओलाचा प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून ओला-उबरच्या चालकांच्या अरेरावीचे आणि प्रवाशांबरोबर केलेल्या असभ्य वर्तवणुकीची काही प्रकरणे समोर आल्यामुळे उबर आणि ओलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका उबर ड्रायव्हरने महिलेला विचित्र मेसेज केला आहे. त्यामुळे उबरमधून प्रवास करणं खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. भूमिका नावाच्या एका महिला डॉक्टरने एक्स (ट्विटर) वर उबर विरोधात तक्रार करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, “उबर इंडिया, मी तुमच्या एका ड्रायव्हरसोबत मला आलेल्या अनुभवाबद्दल माझी गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. १९/१०/२०२३ रोजी प्रवासानंतर मला तुमच्या ड्रायव्हरचा विचित्र मेसेज आले. या घटनेमुळे मी अस्वस्थच झाले नाही तर सुरक्षेविषयी गंभीर चिंता वाटत आहे.”

हेही वाचा- चोरी होऊ नये म्हणून दागिने डस्टबिनमध्ये लपवले, जावयाच्या चुकीमुळे ते थेट डंपिंग ग्राऊंडवर गेले, सुदैवाने असे परत मिळाले

उबर ड्रायव्हरने महिलेला केले मेसेज

भूमिकाने ट्विटरवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये एका अनोळखी नंबरवरुन व्हाट्सअॅपवर मेसेज आल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, “हॅल्लो भूमिका, मी राहुल ओळखलं?, मला तुमच्याबरोबर मैत्री करायची आहे, मी तुम्हाला उबरमधून सोडले होते.” या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत भूमिका म्हणाली, “उबर अशा ठिकाणी पाहिजे की, त्यांच्या चालकांवर महिला विश्वास ठेवू शकतील.” तसेच महिलेने विनंती केली आहे की, “या ड्रायव्हरची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करा जेणेकरुन पुन्हा कोणीही महिलांबरोबर असे गैरवर्तन करणार नाही. या घटनेनंतर मला भीती वाटू लागली होती.”

भूमिकाने २० ऑक्टोबरला सकाळी हे ट्विट केले होते, त्यानंतर सुमारे तीन लाख लोकांनी ते पाहिले असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, “हे भयानक आहे. ड्रायव्हरला आमचा फोन नंबर आणि पत्ता माहिती आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. आणि, आम्हाला उबरवर अवलंबून राहावे लागेल. हे अजिबात सुरक्षित नाही.” तर दुसऱ्याने लिहिलं, “ड्रायव्हरचे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा व्यक्तीला सर्व अॅप्सनी बंदी घातली पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uber driver misbehavior sends strange messages to female passenger screenshots goes viral on social media jap