एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण आजकाल फोनवरून झटपट कॅब बुक करतो. प्रवाश्यांना अगदी घराच्या दारापासून ते इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम ओला, उबर यांसारखे ॲप्स करत असतात. त्या कॅब चालकांवर आपण संपूर्णपणे निर्भर असतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे पोहोचवण्याचे काम अनेक चालक प्रामाणिकपणे करतात. मात्र, प्रत्येकवेळेस कॅब घेऊन येणारा चालक सर्व वाहतूक नियमांचे पालन करतोच असे नाही. असाच प्रकार सध्या मुंबईच्या रस्त्यांवर घडलेला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून @snakeyesV1 या अकाउंटने एका उबर कॅब चालकाचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅब चालक चक्क सोशल मीडियावर व्हिडीओ स्क्रोल करत बघताना दिसत आहे. ही गाडी कुठल्याही ट्राफिकमध्ये किंवा गर्दीत अडकली असताना हा प्रकार घडत नव्हता, तर गाडी अगदी व्यवस्थित वेगात असताना हा चालक आपल्या मांडीवर फोन ठेऊन, एका हाताने व्हिडीओ स्क्रोल करून पाहत; दुसऱ्या हाताने गाडीचे स्टिअरिंग व्हील धरून गाडी चालवत आहे, असे आपण पाहू शकतो.

हेही वाचा : भारतीयांचे पाच भन्नाट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; पत्त्यांच्या बंगल्यापासून ते मेट्रो प्रवास, विक्रमांची यादी पाहा….

हा व्हिडीओ शेअर करून त्याखाली वेंकट [@snakeyesV1] यांनी आपली काळजी कॅप्शनमध्ये लिहून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उबरच्या, उबर इंडिया आणि मुंबई ट्राफिक पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटला टॅगदेखील केले आहे. “मला आजकाल @ubar_india उबर कॅब्समधून प्रवास करणे अजिबात सुरक्षित वाटत नाही, कारण ते प्रचंड धोकादायक पद्धतीने गाड्या चालवतात. हा ड्रायव्हर आपल्या मांडीवर फोन ठेऊन त्यामध्ये व्हिडीओ बघत गाडी चालवत आहे. @MTPHereToHelp हा प्रकार मुंबईमध्ये घडलेला आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात?@ubar_india” अशा स्वरूपाची काळजी आणि प्रश्न केल्याचे आपण कॅप्शनमध्ये पाहू शकतो.

ही पोस्ट शेअर होताच, ताबडतोब मुंबई ट्राफिक पोलिस आणि उबर या दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला ही घटना कुठे घडली आहे ते सांगावे, त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब कारवाई करू.” असे मुंबई ट्राफिक पोलिसांनी सांगितले आहे. यावर व्यंकट यांनी सर्व प्रकार वाशी ते नवी मुंबईदरम्यान असल्याचे सांगितले आहे आणि चालकाच्या गाडीच्या नंबरसाठी उबरकडे मदत मागितली आहे.
“ही खरंच चिंताजनक घटना आहे. प्रवाश्यांची सुरक्षितता हीच आमच्यासाठी महत्वाची असते. आपण आपले रजिस्टर्ड उबर अकाउंट डिटेल्स आमच्यासोबत शेअर करा. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क करेल”, असे उत्तर उबरने दिले आहे.

हा व्हिडीओ एक्स [पूर्वीचे ट्विटर] शेअर होताच यास १४६.६ इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uber driver watching videos while driving the cab in mumbai x post went viral watch video