Uddhav Thackeray Viral Video: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे लाईटहाऊस जर्नालिज्मला लक्षात आले. वर्ध्यातील निवडणूक रॅलीत काँग्रेसच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंना ५ मिनिटेही भाषण करू दिले नाही, असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. एक वेळ होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे सभेत उभे राहिले की अन्य कुणाला मध्यस्थी करण्याची हिंमतही होत नव्हती आणि आता काँग्रेससह हातमिळवणी करूनही उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याचं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे. पण याची तपासणी करताना ही क्लिप खोटी असल्याचे समजतेय, मग नेमकं त्या सभेत घडलं तरी काय हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @Modified_Hindu9 ने २८ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला होता.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

‘उद्धव ठाकरे यांचे वर्ध्यातील भाषण’ हे शब्द वापरून आम्ही गूगल कीवर्ड सर्च करून तपास सुरू केला.आम्हाला झी २४ तासच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला १२ मिनिटांचा व्हिडिओ सापडला.

या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे सदस्य आणि अगदी वर्ध्यातील एमव्हीएचे उमेदवार अमर काळे हे उद्धव ठाकरेंना सभेला संबोधित करण्याचा आग्रह करत असल्याचे दिसत आहे. ठाकरे ५ मिनिटेच बोलू, असे सांगत असताना मंचावरील इतर मंडळी त्यांना किमान १५ मिनिटे बोलण्याचा आग्रह धरत आहेत.

साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओ मध्ये दिसते, एका व्यक्तीने अमर काळे यांना भाषणाच्या वेळी थांबवले आणि सांगितले की उद्धव ठाकरेंच्या परतीच्या विमानाची वेळ लावकारची असलयाने त्यांना लवकर निघायचे आहे.

त्यानंतर २२ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या मेळाव्यात ठाकरे सुमारे १० मिनिटे बोलले व अमर काळे यांच्या भाषणानंतरच लोकांना जाण्याचे आवाहनही शेवटी केले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही वर्ध्यातील काँग्रेसचे तीन वेळा आमदार अमर काळे यांच्याशी संपर्क साधला. अमर काळे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे सभेचे मुख्य अतिथी होते आणि त्यांना उशीर होत असल्याने ते मला म्हणत होते कि मी सभेला संबोधित करावे पण या उलट आम्हाला सगळ्यांनाच त्यांचे भाषण ऐकायचे होते.

हे ही वाचा<< भाजपा SC, ST, OBC आरक्षण संपवणार? अमित शाहांच्या ‘या’ खऱ्या Video मध्ये मुस्लिम आरक्षणाबाबत नेमकं काय म्हटलंय?

निष्कर्ष: वर्ध्यातील निवडणूक सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरेंना बोलू दिले नाही, हा दावा खोटा आहे. उलट कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्याचा आग्रह केला. व्हायरल दावा खोटा आहे.

Story img Loader