UGC NET 2024 Answer Key 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) एनटीएने डिसेंबरच्या परीक्षेसाठी UGC NET उत्तर की २०२४ (Answer Key 2024) जारी केली आहे. जे उमेदवार युजीसी नेट (UGC NET 2024) डिसेंबर २०२४ च्या परीक्षेला बसले आहेत ते UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून उत्तर की तपासून डाउनलोड सुद्धा करू शकतात.
ऑब्जेक्शन विंडो (objection window) उघडण्यात आली आहे आणि ज्या उमेदवारांना प्रोव्हिजनल की वर आक्षेप घ्यायचा आहे ते ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत घेऊ शकतात. कारण ३ फेब्रुवारी रोजी ऑब्जेक्शन विंडो संध्याकाळी ६ वाजता डिएक्टिव्हेट होईल. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहोत. ही प्रक्रिया नॉन-रिफंडेबल असणार आहे. प्रोसेसिंग फी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / युपीआय पेमेंट पद्धतींद्वारे केले जाऊ शकते.
युजीसी नेट उत्तर की २०२४ (UGC NET 2024) डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक
https://ugcnetdec2024.ntaonline.in/answer-key-challenge/login-ugcanswer
युजीसी नेट उत्तर की २०२४ (UGC NET 2024) डाउनलोड कशी करायची?
१. सगळ्यात पहिला UGC NET च्या ugcnet.nta.ac.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. होमपेजवर UGC NET Answer Key 2024 या लिंकवर क्लिक करा.
३. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना त्यांचे लॉगिन डिटेल्स तिथे टाकावे लागतील.
४. सबमिटवर क्लिक केल्यावर तुमची ‘उत्तर की’ प्रदर्शित होईल.
५. उत्तर की एकदा तपासून पाहा आणि डाउनलोड करा.
६. पुढील आवश्यकतेसाठी त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे ठेवा.
ज्या परीक्षार्थींना उत्तरसुचीबद्दल आक्षेप असतील त्यांना त्या प्रश्नाच्या उत्तराविरोधात आव्हान देता येऊ शकते. पण, अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांनी दिलेल्या आव्हानांची (आक्षेप) पडताळणी ‘विषय तज्ज्ञांच्या’ (subject experts) पॅनेलद्वारे केली जाईल. कोणत्याही उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्याचे आढळल्यास, उत्तर की मध्ये सुधारणा केली जाईल आणि सुधारित अंतिम ‘उत्तर की’ च्या आधारे, निकाल तयार केला जाईल आणि घोषित केला जाईल.
कोणत्याही वैयक्तिक उमेदवाराला त्याच्या किंवा तिच्या आव्हानाच्या (आक्षेपबद्दल) ॲक्सेप्टन्स किंवा नॉन ॲक्सेप्टन्सबद्दलची माहिती दिली जाणार नाही. एक्सपर्ट्सनी ठरवलेली की फायनल असेल.
UGC NET डिसेंबर परीक्षा २, ६, ७, ८, ९, १०, १६, २१ आणि २७ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आली.