आपल्याकडे खवय्या लोकांची कमतरता नाही. एकापेक्षा एक खाद्यपदार्थ आपल्याकडे तयार केले जातात. विशेषत: लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमात लोक फक्त चांगले जेवण मिळेल म्हणून जातात. लग्नकार्यात जेवणावर ताव मारणारी अनेक मंडळी पाहिली असतील पण लग्नात जेवणासाठी भांडणाना कधी पाहिले आहे का? उत्तर प्रदेशातील बरेली येथे नुकत्याच झालेल्या लग्नात बिर्याणीतील चिकन लेग पीसचे तुकडे नसल्यामुळे आलेल्या पाहुण्यांमध्ये मोठे भांडण झाले. हे भांडण वाढता वाढता इतके वाढले की एकमेकांना मारण्यापर्यंत पोहचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चिकन बिर्याणी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. काही लोकांना चिकन बिर्याणी इतकी आवडते ती मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अशातच लग्न कार्यामध्ये जर मोफत चिकन बिर्याणी खायला मिळाली तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट या लोकांसाठी दूसरी कोणतीही असू शकत नाही. पण एवढ्या उत्साहाने लग्नात चिकन बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना जर चिकन लेगपीस नाही मिळाले तर निराशा होणे सहाजिक आहे. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशातील लग्नात घडला. लग्नात दिल्या जाणाऱ्या चिकन बिर्याणीत पायाचे तुकडे नसल्याचे वराच्या बाजूच्या पाहुण्यांच्या लक्षात आल्यावर गोंधळ सुरू झाला. तक्रार करता करता जो वाद सुरु झाला तो क्षणार्धात हाणा-मारीपर्यंत पोहचला. इव्हेंटच्या व्हायरल फुटेजमध्ये पाहुणे एकमेकांना लाथा मारताना, मुक्का मारताना आणि खुर्च्या फेकताना दिसत आहेत.

हेही वाचा – तरुणीची एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणीबरोबर घडलं असं की..,पाहा मृत्यूचा थरारक VIDEO  

हेही वाचा – देसी हॅरी पॉटर! झाडू वापरून तरुणाने बनवली हटके बाईक, Video पाहून नेटकरी चक्रावले

दोन्ही कुटुंबे हिंसकपणे भिडल्याने लग्नात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लग्नातील कोणीतरी हे दृश्य रेकॉर्ड केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला जिथे त्याने त्वरीत व्यापक लक्ष वेधले. भांडणाचे सार्वजनिक स्वरूप आणि ऑनलाइन लक्ष देऊनही, पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “त्यांना या घटनेची माहिती आहे आणि औपचारिक तक्रार दाखल केल्यास ते योग्य ती कारवाई करतील.”