Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटणांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक जबरदस्त हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये महिला प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. अशात आता काही महिला प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बस असो, लोकल ट्रेन असो की मग मेट्रो असो जागेसाठी भांडणं ही होतातच. प्रत्येकालाच बसून प्रवास करायचा असतो. त्यामुळे मग संधी मिळताच लोक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. अन् त्या नादात अनेकदा यथेच्च भांडणही करतात. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रोमध्ये दोन महिला एकाच जागेवर उभं राहण्यासाठी भांडत आहेत. सुरूवातीला हे भांडण शाब्दिक होतं. पण मग हळूहळू भांडण इतकं वाढलं की त्यांनी अक्षरश: हाणामारी करण्यास सुरूवात केली. दोघांनी एकमेकांना अक्षरश: बुकलून काढलं. या भांडणाचा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चालत्या कारवर अचानक कोसळली वीज; अन् बघता बघता संपूर्ण कुटुंब…अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ugly scene unfolds on delhi metro as women fight for space to stand women fight in delhi metro video goes viral trending srk