Viral Video: लॉकडाऊननंतर अनेक सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर, ब्लॉगर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एखादा मजेशीर, भावुक तर एखादा खास संदेश हे सर्व इन्फ्लूएन्सर या व्हिडीओच्या माध्यमातून देत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एका इन्फ्लूएन्सर जोडप्याने भारतात येऊन रिक्षातून त्यांचा नऊ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कोण आहे हे खास जोडपं चला पाहू.

अलीकडेच ब्रिटनमधील एक जोडपं प्रवास करीत भारतात आले आहेत. या जोडप्याचे युट्यूबवर ‘द हैप्पी डेज’ (These Happy Days) चॅनेल आहे. लियाम (Liam) आणि जेनिन (Janine) यांनी भारतातील वैविध्यपूर्ण निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिली आहे. तसेच भारतातील विविध ठिकाणांना भेट देताना या जोडप्याने ऑटोरिक्षाची निवड केली. तसेच खास गोष्ट अशी की, त्यांनी भारतातील या नऊ महिन्यांच्या प्रवासादरम्यान ऑटोरिक्षातून कन्याकुमारी ते अमृतसर असा नऊ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
amaltash movie
सरले सारे तरीही…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हेही वाचा…मोफत ज्यूससाठी हॉटेलमध्ये रंगला खेळ; तरुणाने बटण दाबताच सुरु झाला टास्क अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

”द इंडियन एक्स्प्रेसला” दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी संपूर्ण भारतातील त्यांच्या साहसी प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. भारतातील अनेक शहरांत ऑटोरिक्षा चालवण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता जेनिनने खुलासा केला की, भारतात नऊ हजार किमीचा प्रवास करताना जेनिन हा रिक्षाचालक होता, तर लियाम ही प्रवासी म्हणून प्रवास करत होती. तसेच लियामने चेन्नईच्या एका शांत परिसरात अर्धा तास रिक्षा चालवण्याचा सराव केला.

तसेच या जोडप्याने महाशिवरात्री साजरी करण्याचा अनुभवही सांगितला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thosehappy_days आणि @vegan_food_uk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या जोडप्याचे कौतुक करताना तर त्यांच्या प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत

Story img Loader