इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेले नारायण मूर्ती आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जाते. याची झलक नुकतीच पाहायला मिळाली, जेव्हा अक्षता मूर्ती या बंगळुरूच्या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे पुस्तके खरेदी करताना दिसल्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक मूर्ती कुटुंबाच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
उल्लेखनीय गोष्ट अशी की, अक्षता मूर्ती यांचे पती ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. तरीही अक्षता मूर्ती जेव्हा जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्या कोणत्याही सुरक्षेशिवाय,सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या पालकांबरोबर बंगळुरूमध्ये फिरताना दिसतात. एका सोशल मीडिया यूजरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षता मूर्ती त्यांच्या दोन मुली, वडील नारायण मूर्ती आणि आई सुधा मूर्तीबंगळुरूच्या राघवेंद्र मठ परिसरात पायी चालत फिरताना दिसत आहेत. या वेळी अक्षता मूर्ती यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवरून काही पुस्तकेही खरेदी केली. युजरने अक्षता मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या साधेपणाचे कौतुक केले. इतर वापरकर्ते देखील कुटुंबाचे खूप कौतुक करत आहेत.
अलीकडेच, अक्षता मूर्ती आणि त्यांचे वडील नारायण मूर्ती बंगळुरूमधील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये सामान्य लोकांप्रमाणे आईस्क्रीम खाताना दिसले होते. वडील आणि मुलगी दोघे ज्या आईस्क्रीमचा आस्वाद घेत होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि लोकांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे हे कुटुंब नेहमीच त्यांच्या साधेपणामुळे सर्वांचे मन जिंकतात.
हेही वाचा – घरच्या घरी बनवा हळदीपासून कुंकू! आजीबाईंनी संगितली ट्रिक, पाहा Viral Video
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी विवाहबद्ध झालेली अक्षता मूर्ती केवळ त्यांच्या राजकीय संबंधांमुळेच नाही तर त्यांच्या भारतभेटींमुळेही चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी, जी२० शिखर परिषदेसाठी आपल्या पतीसोबत भारत भेटीदरम्यान त्या आल्या होत्या, ही पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच भेट होती.