ऑलिम्पिकमधल्या भारताच्या कामगीरीवर आता ब्रिटनच्या पत्रकराने देखील भारताची खिल्ली उडवली आहे. एकीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बॅटमिंटनपटू पी. व्ही.सिंधू या दोघींचेही भारतात जंगी स्वागत सुरू आहे. या दोघींनी देशाला दोन पदक मिळवून दिली आहेत तर दुसरीकडे ब्रिटनच्या पिअर्स मॉरगन या पत्रकाराने भारताच्या ऑलिम्पिकमधल्या सुमार कामगीरीवर बोट ठेवले आहे. ‘१.२ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात २ पदक मिळवल्या बद्दल जल्लोष होत आहे हे लज्जास्पद आहे’ असे ट्विट त्यांने केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे साहाजिक भारतीय नेटीझन्सने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नेटीझन्सने त्याला चांगलेचे प्रतित्युर दिले आहे. लेखक चेतन भगत यांनी देखील त्याचा समाचार घेतला. ‘पहिल्या तीनमध्ये येणे हे लज्जास्पद नसून आम्ही आमच्या खेळाडूंचा सन्मान करतो’ अशी प्रतिक्रिया चेतन भगत यांनी या ट्विटवर दिली आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराने रिओ ऑलिम्पिकमधल्या भारताच्या कामगीरीची खिल्ली उडवली होती. एक पदक जिंकले असताना वीस पदक जिंकल्यासारखा जल्लोष सुरु आहे असे उपहात्मक ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटवर देखील भारतीय नेटीझन्स चांगलेच भडकले होते. इतकेच नाही तर अभिनेता अमिताभ बच्चनने देखील या पाकिस्तानी पत्रकाराला ट्विट करून सणसणीत टोला लगावला होता.
Country with 1.2 billion people wildly celebrates 2 losing medals. How embarrassing is that? https://t.co/FYSBM7ErAf
— Piers Morgan (@piersmorgan) August 24, 2016
We honor achievers Peirs. Top 3 in the world,despite 3rd world sports facilities isn’t loser.It is freaking amazing! https://t.co/pbFuP0Hmky
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) August 24, 2016