Man Tries To Open Plane Door Video Viral : क्रोएशियाच्या जदरच्या रयानएअरच्या फ्लाईटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. इंग्लंडच्या एका २७ वर्षीय तरुणाने विमानाने उड्डाण घेतल्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या भयानक घटनेनंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रयानएअरचे विमान प्रवाशांनी खचाखच भरले असताना एक प्रवासी सीटवरून अचानक उठला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करु लागला. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

विमानातील प्रवासी दरवाजा उघडा असं जोरजोरात ओरडू लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर दोन प्रवाशांनी त्या तरुणाला पकडलं आणि खाली पाडलं. विमान रनवेवरून जात असताना लंडनसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. हिडआऊट क्रोएशिया संगीत समारंभाच्या कार्यक्रम पार पाडून अनेक प्रवासी विमानात दाखल झाले होते. हा कार्यक्रम पाग बेटावर आयोजित करण्यात आला होता.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू

नक्की वाचा – सावधान! समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताय? मग ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रवाशाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आलीय. एअरलाईनच्या एका प्रवक्त्याने या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, जादरहून लंडन स्टॅनस्टेड (३० जून) विमान टेक-ऑफ करण्याच्या तयारीत होतं. त्याचदरम्यान प्रवाशाच्या गोंधळामुळं विमान थांबवण्यात आलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्या प्रवाशाला अटक केली. त्यानंतर विमान प्रवास पुन्हा सुरु करण्यात आलं.

Story img Loader