तुम्हाला लहानपणीचे (म्हणजे तुमचा जन्म ९० च्या दशकातील असेल तर) ‘पोकेमॉन’ कार्ड आठवतायत का? होय.. होय… आम्ही त्याच काळाबद्दल बोलतोय जेव्हा चिटोजमधील टॅझो आणि हे पोकेमॉन कार्ड म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण होते. या पोकेमॉन कार्डचा लिलाव करुन एक ३४ वर्षीय व्यक्ती आता लखपती झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र वयाच्या १३ व्या वर्षी गिफ्ट म्हणून मिळालेला पोकेमॉन कार्डचा १०३ पत्त्यांचा सेट लिलावामध्ये विकून या व्यक्तीने चक्क ३३ लाखांची कामाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा  >> Video: झुडपांमध्ये जोडप्याचे सुरू होते अश्लील चाळे, संतापलेल्या आजीबाई आल्या आणि…

ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे राहणाऱ्या निगेल ब्रुक्सला वयाच्या १३ व्या वर्षी भेट म्हणून पोकेमॉन कार्डचा सेट मिळाला होता. आपल्या छोट्या भावाला शाळेमध्ये होणाऱ्या बुलिंगपासून म्हणजेच इतर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या छळापासून वाचवल्यामुळे निगेलला त्याच्या आईने हा पोकेमॉन पत्त्यांचा कॅट बक्षिस म्हणून गिफ्ट केला होता. विशेष म्हणजे त्याच काळामध्ये निगेलचा वाढदिवस असल्याने टू इन वन कारण देत त्याच्या आईने हे गिफ्ट त्याला दिलं होतं. मात्र निगेल काही पोकेमॉनचा चाहता नसल्याने आईने त्याला त्यावेळी दिलेले ३०० पौंडचं (२८ हजार रुपये ) हे गिफ्ट फारसं आवडलं नव्हतं.

नक्की वाचा  >> COVID 19 नंबर प्लेट असणाऱ्या BMW गाडीमुळे गूढ वाढले; गाडीवरील कव्हर उडाला आणि…

आता ज्या विषयाची आवडच नाही त्याचे गिफ्ट मिळाल्याने निगेलने हा पत्त्यांचा कॅट कुठेतरी अडगळीच्या खोलीत ठेवला. आता २१ वर्षानंतर तो निगेलला पुन्हा सापडला असून ३४ वर्षीय निगेलला याचे आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे आता निगेलला हा कॅट सापडल्यानंतर पोकेमॉनचे एवढे पत्ते एकाच कलेक्शनमध्ये असणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे समजले. त्याने हा कॅट त्याने लिलाव करण्याचा ठरवले. या पत्त्यांसाठी फारसे पैसे मिळतील अशी अपेक्षा निगेलला नव्हती. मात्र त्याने थेट १०३ पोकेमॉनची माहिती असणाऱ्या पत्त्यांचा कार्ड लिलावासाठी काढल्याचे समजल्यानंतर पोकेमॉन चाहत्यांच्या यावर उड्या पडल्या. अखेर एका पोकेमॉन चाहत्याने चक्क ३५ हजार पौंड म्हणजेच ३३ लाख २८ हजार रुपये दिल्याचे ‘द डेली मेल’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.