ब्रिटनमधील चेस्टर प्राणीसंग्रहालयात ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच आर्डवार्कचा जन्म झाला आहे. याबाबत चेस्टर झूने माहिती देताना सांगितले की जन्माला आलेली अर्वार्क ही स्त्री आहे. हॅरी पॉटर सिरिजमधील डॉबी या पात्रावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. दरम्यान आर्डवार्क उप-सहारा आफ्रिकेत आढळतात, जेथे कृषी विकासाच्या परिणामी त्यांचे निवासस्थान नष्ट होत आहे.
प्राणीसंग्रहालयाने त्यांच्या वेबसाइटद्वारे या आर्डवार्क बद्दल माहिती दिली आहे की, बेबी आर्डवार्कचे कान मोठे आहेत, तसेच शरीरावर एकही केस नाही. सुरकुत्या असलेली त्वचा आणि मोठे नखे आहेत. त्यामुळे या आर्डवार्कची खूप काळजी घेतली जात आहे. दर काही तासांनी जेवण देखील दिले जात आहे. दरम्यान तेथे तज्ञांचे पथक सतत आर्डवार्कवर लक्ष ठेवून आहेत. या प्राणिसंग्रहालयाच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच आर्डवार्कचा जन्म झाला आहे, त्यामुळे आर्डवार्क प्रेमींसाठी हा एक अद्भुत क्षण आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे आर्डवार्कची संख्या कमी होत आहे. मांसासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहेत. ट्वायलाइट संघाचे व्यवस्थापक डेव्ह व्हाईट यांनी सांगितले की, या प्राणिसंग्रहालयात जन्माला आलेला हा पहिला आर्डवार्क आहे आणि त्यामुळे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच जेव्हा या आर्डवार्क मुलाला त्याच्या आईच्या शेजारी पाहिले तेव्हा तो हॅरी पॉटरच्या पात्र डॉबीसारखा दिसत होता, म्हणून त्याचे नाव तेच ठेवले.
जगभरात फक्त एवढेच आर्डवार्क
युरोपमधील प्राणीसंग्रहालयात फक्त ६६ आर्डवार्क आणि जगभरातील प्राणीसंग्रहालयात फक्त १०९ शिल्लक आहेत. वेबसाइटनुसार, आर्डवार्क या शब्दाचा अर्थ आफ्रिकन भाषेत ‘डुक्कर’ असा होतो. हे निशाचर प्राणी मुंग्या तसेच किडे शोधण्यासाठी त्यांचे लांब नाक आणि वासाचा वापर करतात. या आर्डवार्कची जीभ ही २५ सेमी पर्यंत लांब असते.