Viral Video : उखाणा घेणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा आहे. कोणतेही शुभ कार्य असो किंवा लग्नसमारंभ आवडीने महिला पतीचे नाव घेत आवडीने उखाणा घेतात. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा तितक्याच उत्साहाने पत्नीचे नाव घेत उखाणा घेताना दिसतात.
उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय.
हल्ली सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सातारची मुलगी सुंदर उखाणा घेताना दिसतेय. हा व्हिडीओ ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Ukhana Video a girl from satara said amazing ukhana by mentioning the name of chatrapati shivaji maharaj video goes viral)
सातारच्या मुलीचा उखाणा चर्चेत (a girl from satara said amazing ukhana)
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला तुम्हाला स्टेजवरील दिसेल. तिथे साताऱ्याची एक तरुणी खूप सुंदर उखाणा घेताना दिसते. उखाणा घेताना ही तरुणी म्हणते, “छत्रपती आहेत स्वराज्याचा हिरा, रावांचे नाव घेते उखाणा करते पूरा” तरुणीने उखाणा म्हणताच एकच प्रेक्षक व स्टेजवरील लोक एकच जल्लोष करतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “सातारच्या मुलीचा उखाणा”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
i_love_satara या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कसा आहे सातारच्या मुलीचा उखाणा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कसा आहे सातारच्या मुलींचा उखाणा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रुक्मिणी चा लाडका विठू सावळा, रुक्मिणी चा लाडका विठू सावळा : …….. च नाव घेतो मी छञपतीचा मावळा..” तर एका युजरने लिहिलेय, “जय जिजाऊ जय शिवराय ताई.” आणखी एका युजरने लिहिलेय,”जय जिजाऊ जय शिवराय ताई” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.