Ukhana Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विवाहित महिला किंवा पुरुष उखाणा घेतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असावेत. उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. उखाण्यातून लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते. सध्या अविवाहित तरुण तरुणी सुद्धा आवडीने मजेशीर उखाणा घेतात आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अविवाहित तरुणी भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. या तरुणीने लाल साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ घातली आहे. ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय. या तरुणीने एक मजेशीर भन्नाट उखाणा घेतलाय. ती उखाणा घेताना म्हणते, “टायर पंक्चर झाला की आपण भरतो हवा… टायर पंक्चर झाला की आपण भरतो हवा… आता मला बॉयफ्रेंड नको, डायरेक्ट नवराच हवा”
उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या अविवाहित तरुणीने थेट उखाण्यातून बॉयफ्रेंड नाही तर नवरा पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : मुंबई लोकलमधून महिलांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

vip_marathi_mulgi या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मार्केटमध्ये नवा उखाणा” या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukhana video an unmarried young woman told funny ukhana video goes viral on instagram reel social media trending news ndj