Ukhana video: उखाण्याला आपल्याकडे खूप महत्त्व असते. लग्नाकार्यात किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला लावले जातात. एकमेकांचे नाव घेणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. बरेच जण जुने झालेले तेच तेच उखाणे घेतात पण ज्यांच्याकडे कलात्मकता असते ते नव्याने उखाणे रचतात आणि त्यात आपल्या जोडीदाराचे नाव घालतात. प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे काही जणांकडे खास स्कील असते. पूर्वीच्या काळी मोठेच्या मोठे उखाणे घेण्याची पद्धत होती. आता मात्र आताच्या काळाशी निगडीत असे हटके उखाणे घेण्याला तरुणांकडून पसंती दिली जाते. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींनी घेतलेले उखाणे बरेच व्हायरल होतात नुकताच एका मराठमोळ्या आजींनी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय गावरान भाषेत पण तितक्याच ठसक्यात त्यांनी घेतलेला उखाणा ऐकून आपल्यालाही हसू आल्याशिवाय राहत नाही.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्न समारंभात लयबद्ध पद्धतीने आवडीने जोडीदाराचे नाव घेतले जाते यालाच आपण उखाणा म्हणतो. पूर्वी महिला त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात.सोशल मीडियावर पुरुष किंवा महिलांचे उखाणे घेतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा महिला विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. या या आजीबाईंचाही सैराट स्टाईलमधला एक उखाणा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असलेल्या या आजींचे वयही ७० ते ८० च्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. गुलाबी रंगाची सुती साडी, कपाळावर लाल मोठं कुंकू लावलेल्या या आजीबाई दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल असा काय घेतला आजीबाईंनी उखाणा? तर या आजीबाईंनी “मळ्याच्या मळ्यात होतं निंबोनीचं झाड त्याला आली मिरची उत्तम पाटील माझे परशूराम आणि मी त्यांची आर्ची” मिश्किल विनोदी असा उखाणा या आज्जींनी घेऊन सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “होणार सून मी या घरची” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; सासरची मंडळीही पाहतच राहिली
या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा उखाण्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आजींनी अतिशय अनोखा उखाणा घेतला आहे.यावर नेटकरीही वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “एक नंबर आजी” तर आणखी एकानं आजी काही ऐकत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी टाकले आहेत.