Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पाहून पोट धरुन हसायला येते.
सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काकूंना उखाणा घेण्यास विचारतात तेव्हा काकू इंग्रजीत भारताची प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात करतात. या काकूंचा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा लग्नसमारंभात आवर्जून विवाहीत स्त्रिया काव्यमय पद्धतीने नवऱ्याचे नाव घेतात म्हणजेच उखाणा घेतात. पण या काकू हटक्या पद्धतीने इंग्रजीत उखाणा घेताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! आता… महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल होताच फुटलं वादाला तोंड
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या काकूभोवती काही महिला आणि मुली घोळका करुन उभ्या असतात आणि काकूंना उखाणा घेण्यास विचारतात. तेव्हा काकू इंग्रजीत भारताची प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात करतात. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हा कोणता उखाणा आहे पण नंतर काकू हटक्या पद्धतीने काकांचे नाव घेताना दिसते.
काकू उखाणा घेताना म्हणते, “”इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर…ओन्ली वन ज्ञानदेव इज माय मिस्टर” काकूंचा हा भन्नाट उखाणा ऐकून आजुबाजूच्या महिला जोरजोराने टाळ्या वाजवताना आणि हसताना व्हिडीओत दिसत आहे.
athvani_tuzya_mazya या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “बाकी काही पण म्हणा पण उखाणा एक नंबर होता राव” काही युजर्सनी या मजेशीर व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.