Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा जुने व्हिडीओ पुन्हा चर्चेत येतात. सध्या उखाण्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नववधू तरुणी उखाणा घेताना दिसत आहे.
उखाणा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. शुभप्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी उखाणा घेण्याची परंपरा आहे. उखाणा म्हणजे काव्यमय पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. या व्हायरल व्हिडीओमध्ये ही तरुणी अनोख्या पद्धतीने नवऱ्याचं नाव घेते.
या व्हिडीओत एका विवाहीत तरुणीला नाव घेण्यास विचारतात. तेव्हा ही तरुणी नवऱ्याचं नाव घेत उखाणा घेते. तरुणीचा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तरुणी म्हणते, “आमचं लग्न होईल की नाही, हे टेन्शन असताना आज स्वप्न झाले साकार, संतोषरावांनी खूप कष्ट घेतले घरच्यांकडून मिळवण्यास होकार.”
तरुणीचा हा उखाणा ऐकून आजुबाजूला उभी असलेली नातेवाईक मंडळी खूप जोरजोराने हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : VIDEO : पिंजऱ्याची कडी काढून महिलेच्या अंगावर धावले माकड, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
___avanti___04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.” एका युजरने लिहिलेय, “उखाणा छान घेतला. एक नंबर नाद खुळा” तर एका युजरने लिहिलेय, “लग्न झालं, आता खुश राहा” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई तुमचा आवाज खूप छान आहे.”