रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन आज पाच दिवस लोटले आहेत. सातत्याने रशियाकडून युक्रेनमधील शहरांवर हवाई हल्ले केले जात आहेत. बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी संघर्ष करताना दिसतोय. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेक देशांच्या नेत्यांकडे मदतीची मागणी केली असली तरी कोणीही प्रत्यक्ष सैन्य युक्रेनच्या मदतीला पाठवलेलं नाही. असं असताना युक्रेनची जनता आणि तेथील यंत्रणाच रशियाविरोधात उभी राहिलीय. या संघर्षामध्ये युक्रेनचे नागरिक आणि संस्था आपआपल्या परीने रशियाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उदाहण तेथील रस्ते बांधणी आणि व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून समोर आलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनमध्ये रस्ते बांधणी आणि व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने रस्त्यावरील दिशादर्शक फलक बदलले आहेत. आपल्या देशात घुसखोरी करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन लष्कराच्या वाहनांना आणि तोफांना गोंधळात टाकण्यासाठी हा बदल करण्यात आलाय. सरकारी मालकीच्या युक्राव्हटोडोर नावाच्या कंपनीने फेसबुक पोस्टमधून यासंदर्भातील माहिती देतानाच आवाहनही केलं आहे. रशियन लष्कराला येथील प्रदेशाची फार कमी माहिती आहे ते इथे योग्य प्रकारे फिरु शकणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय अशा आशयाची ही पोस्ट आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

“चला त्यांना थेट नरकामध्ये जाण्यासाठी मदत करुयात,” असा उल्लेख पोस्टमध्ये करत केंद्रीय पद्धतीने युक्रेनमधील सर्व रस्त्यांची देखभाल आणि बांधणी करणाऱ्या या कंपनीने एक आवाहन केलंय. युक्रेनमधील सर्व शहरांमधील स्थानिक प्रशासन आणि तेथील कार्यालयांना रस्त्यांचे दिशा फलक बदलण्याचे आदेश देण्यात आलेत. चुकीची माहिती दर्शवणारे फलक लावण्यात यावेत असं सांगण्यात आलं आहे. यामुळे देशामध्ये शिरकाव करुन राजधानी किव्हपर्यंत जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रशियन लष्कराचा, तोफांचा मार्ग चुकावा आणि त्यांचा गोंधळ उडावा असा यामागील हेतू आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”

कंपनीने एक एडीटींग केलेला दिशादर्शक फलकाचा फोटोही पोस्ट केलाय. या फलकावर दिशा दाखवून “गो फ** युआरसेल्फ”, “गो फ** युआरसेल्फ अगेन” आणि “गो फ** युआरसेल्फ बॅक इन रशिया” असा मजकूर लिहिण्यात आलाय.

केवळ फलक बदलून नाही तर शक्य त्या सर्व मार्गांनी शत्रूला रोखा असं कंपनीने पोस्टमध्ये म्हटलंय. रस्त्यात टायर जाळून, झाडं पाडून त्यांचा अडथळा निर्माण करुन रशियन लष्कराला रोखण्याचा प्रयत्न करा असा पोस्टमध्ये उल्लेख आहे. “त्यांनी इथं यावं अशी आपली अपेक्षा नाहीय हे त्यांना कळलं पाहिजे. त्यांना आपण प्रत्येक रस्त्यावर, नाक्यावर अडथळा निर्माण करुयात,” असं आवाहन कंपनीने सर्वसामान्यांना केलंय.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

दरम्यान, रशियाने बेलारुस, काळा समुद्र आणि उत्तरेला असणाऱ्या रशियन सीमेवरुनही युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine company removing road signs to confuse russian troops let us help them get to hell scsg