मागच्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धाचे अनेक हादरवून टाकणारे व्हिडीओ आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणी रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनच्या निशस्त्र नागरिक त्यांना भिडताना दिसताहेत. काही जणांनी तर रशियन लष्कराला रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. युक्रेनमधून सतत हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या आणि व्हिडीओ येत आहेत. अशातच काही युक्रेनियन रशियन टँकवर बसून त्याचा आनंद घेतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्यांनी जाळला करोडोंचा रशियन टँक! Video Viral

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
Car is going viral on social media because of the quotes written on its back funny photo goes viral
PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे लिहलं असं काही की…वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी
kamala harris speech after defeat from donald trump
Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कमला हॅरिस यांचं भावनिक भाषण; म्हणाल्या, “या निवडणुकीचे परिणाम…”

या २४ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये काही पुरुष रशियन टँकवर बसून हाय-स्पीड राइडसाठी जाताना दिसत आहेत. यावेळी ते टँकवर बसून जल्लोष देखील करत आहेत. त्यापैकी एक ज्याने हे सगळं फोनवर रेकॉर्ड केलंय तो त्यांच्या भाषेत “आम्ही करून दाखवलं” आणि “युक्रेनचा गौरव” असं जोरात ओरडत आहे. तो हे बोलत असताना त्याचे मित्र हसतात आणि जल्लोष करतात.

व्हिडीओमध्ये रशियन लष्कराचा टँक ज्याला आर्मर्ड बॅटल टँक म्हणून ओळखलं जातं ते दिसतंय. खार्किवमधील बर्फाच्छादित शेतातून ही टँक हे नागरिक चालवताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक युक्रेनियन लोकांनी शस्त्रे आणि वाहने सोडून पळून गेलेल्या रशियन सैनिकांचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत आहेत.