युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाला एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. रशियाने युक्रेनवर हवाई, लष्करी आणि नौदलाच्या माध्यमातून हल्ले सुरुच ठेवले आहेत. असं असतानाच दुसरीकडे रशियाच्या तुलनेत फारच कमी लष्करी ताकद असणाऱ्या युक्रेनकडून या हल्ल्याला कडवा प्रतिकार केला जातोय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) अगदी सर्व सामान्य व्यक्तीही लष्कराच्या मदतीला धावून आले आहेत. एकीकडे रशियन सैन्य गोळीबार आणि हिंसाचार करत असतानाच दुसरीकडे युक्रेनियन सैन्य सर्वसामान्यांच्या मदतीने लढताना दिसताय. युक्रेनियन सैनिक शत्रूविरोधात लढत असतानाच शत्रूची काळजीही घेत असल्याची एक अनोखी बातमी समोर आलीय. युक्रेन युद्धामधील अनेक भावनिक आणि कौतुकास्पद प्रसंग समोर येत असतानाच आता युक्रेननेही त्यांच्या देशात घुसखोरी करणाऱ्या रशियन सैनिकांसाठी एक खास सेवा सुरु केल्याची माहिती समोर येतेय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये युद्धासाठी आलेल्या रशियन सैनिकांच्या कुटुंबियांसाठी एक हॉटलाइन सेवा सुरु केलीय. या सेवेचं नाव त्यांनी, ‘कम बॅक अलाइव्ह फ्रॉम युक्रेन’ असं ठेवलंय. ‘किव्ह इंडिपेण्डंट’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या हॉटलाइन सेवेवर आतापर्यंत शेकडो कॉल आले आहेत. युक्रेनने पकडलेल्या रशियन सैनिकांच्या कुटुंबियांना आवाहन केलं आहे की त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी या हॉटलाइनचा वापर करावा. त्यांच्या देशाने पुकारलेल्या युद्धाचा विरोध करावा असंही युक्रेननं रशियन सैनिकांच्या कुटुंबियांना सांगितलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये पकडलेल्या किंवा मरण पावलेल्या रशियन सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आलीय. जिवंत पकडलेल्या रशियन सैनिकांना युद्धकैदी म्हणून ताब्यात घेण्यात आलंय. युक्रेनच्या या हॉटलाइनवर रशियामधून शेकडो सैनिकांच्या मातांनी फोन केले आहेत. काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

नक्की वाचा >> चेल्सी फुटबॉल क्लब विकणे आहे!; सगळा निधी युक्रेनच्या युद्धग्रस्तांना देणार रशियन मालक

युक्रेननं अनेक जखमी रशियन सैनिकांचे व्हिडीओ जारी केलेत. या व्हिडीओमध्ये सैनिक त्यांचं म्हणणं मांडताना दिसत आहेत. शनिवारपासून सुरु करण्यात आलेल्या एका टेलिग्राम चॅनेलवरुन हे व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. यामध्ये युक्रेनने ताब्यात घेतलेले रशियन सैनिक दिसत असून या सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांची परिस्थिती फोनवरुन कळवल्यानंतर आपल्या जवळची व्यक्ती युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामधील तुकडीत असल्याचं जाणून अनेकजण थक्क होत आहेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

युक्रेनकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या या व्हिडीओंवर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. रशियाने आपल्या सैनिकांबद्दल फारच कमी माहिती सार्वजनिक केलीय. रविवारी पहिल्यांदाच रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्या तुकड्यांमधील काही सैनिक मारले गेल्याची आणि काही जखमी झाल्याची कबुली दिलीय.