रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनवर रशियन फौजांनी हल्ला केला. युक्रेनची राजधानी असणाऱ्या किव्हवर चाल करुन जात असणाऱ्या रशियन सैन्यालाच आता या युद्धामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कुठे इंधन संपल्याने बंद पडलेले रणगाडे तर कुठे दिशाहीन झालेल्या फौजा असं चित्र रशियन सैन्यासंदर्भात सध्या दिसत आहे. त्यात मूळ रशियन भूमीपासून दूर आल्याने रसद आणि दारुगोळ्याची टंचाईसुद्धा जाणवत असल्याच्या बातमी समोर येत आहेत. अशाच रशियन लष्कराची दयनीय अवस्था दाखवणार आणखीन एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये चक्क एक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरने बंद पडलेला रशियन रणगाडा ओढताना दिसतोय.
नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा