रशिया-युक्रेन दरम्यानचे युद्ध सुरूच आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन आणि रशिया या दोन्हींच्या राष्ट्राध्यक्षांची फोनवरून संवाद साधत युद्ध चर्चेतून सोडवण्याचं आवाहन केलं. दरम्यान, रशियाचं युक्रेनवरील आक्रमण कायम असून रशियन सैन्याकडून हल्ले सुरूच आहेत. या भीषण युद्धात युक्रेनचे सैन्य आणि युक्रेनमधील नागरिक देखील रशियाविरोधात उतरले आहेत. अनेक जण आपल्या देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत रशियन सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच एका नागरिकाने रशियन टँकवर चढून युक्रेनचा झेंडा फडकावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?;’ संतापलेल्या इम्रान खान यांचा भर सभेत सवाल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक युक्रेनियन माणूस हातात युक्रेनियन राष्ट्रध्वज घेऊन रशियन टँकवर चढताना दिसत आहे. हा माणूस टँकवर चढल्यानंतर त्याने युक्रेनचा ध्वज फडकावला. त्याच्या या कृतीवर जमलेल्या लोकांनी जल्लोष केला. रशियन टँक आणि या ताफ्याभोवती अनेक लोक युक्रेनचा राष्ट्रध्वज हातात घेऊन दिसत आहेत.

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये किमान ३६४ नागरिक ठार झाल्याची पुष्टी झाली आहे आणि ७५९ जखमी झाले आहेत. खरी संख्या जास्त असू शकते, असे संयुक्त राष्ट्राच्या देखरेख मिशनने रविवारी सांगितले.

Ukraine War: एकला चलो रे… युक्रेन सोडण्यासाठी ११ वर्षाच्या मुलाने एकट्याने केला एक हजार किमीचा प्रवास


तर, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने रविवारी युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याच्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचा शेवटचा टप्पा सुरू केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधील हंगेरिया सिटी सेंटरमध्ये पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrainian man climbs onto russian tank waves national flag as crowd cheers video hrc
Show comments