महिलांना कधीही वय विचारू नये, कारण त्या नेहमीच चुकीचं वय सांगतात, असं आपण ऐकत आलो आहे. पण ही गोष्ट तुर्कीमधल्या एका पारपत्र अधिकाऱ्याने फारच गांभीर्याने घेतली. विमानतळावर तपासणी करत असताना त्याने एका महिलेला रोखलं तिचं वय चुकीचं असल्याचं सांगत तिला बराच वेळ थांबवून ठेवले. शेवटी त्याला खात्री पटवून दिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली.

न्यॅटली झेनकिव असं या महिलेचं नाव असून ती युक्रेनमधील गायिका आहे. सुट्ट्या व्यतित करण्यासाठी ती तुर्कीला गेली होती. घरी परतताना विमानतळावर अधिकाऱ्यांनी तिला अडवलं. पासपोर्टवर तिचं वय ४१ असं लिहिलं होतं. पण अधिकाऱ्यांना मात्र हे पटत नव्हतं. अधिकाऱ्यांच्या मते, ती फक्त २१ वर्षांची तरुणी आहे. ती ४१ वर्षांची महिला असल्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ती फसवणूक करत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला त्यामुळे न्यॅटलीला काही काळ चौकशी विभागात ताटकळत उभं राहावं लागलं.

वाचा : .. म्हणून ‘प्लेबॉय’चे जनक ह्यू हेफनर यांचं विमान होतं खास!

शेवटी हा आपलाच पासपोर्ट असल्याच पटवून देण्यात तिला यश आलं. वयापेक्षा मी अधिकच तरुण दिसते म्हणून लोक माझं नेहमीच कौतुक करतात, मला खूप छान वाटतं पण कधी यावरून मला एवढ्या मोठ्या अडचणीला समोर जावं लागेल याचा विचार मी चुकूनही केला नव्हता अशी प्रतिक्रिया तिने एका इंग्रजी वेबसाईटला दिली आहे.

Viral : ..म्हणून बॉसने कर्मचाऱ्याला चिकटपट्टी लावून भिंतीवर टांगले

Story img Loader