ulhasnagar railway station video viral एका ट्रॅकवर जर दोन ट्रेन समोर आल्या तर काय होईल? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. देशभरात दररोज १२००० ट्रेन धावतात. यामध्ये मालगाडीचा समावेश केला तर ही संख्या २३००० पेक्षा जास्त होईल. चोवीस तास एवढ्या मोठ्या संख्येत ट्रॅक्सवर ट्रेन धावत असतात. एका एका ट्रॅकवर ट्रेन थोड्या थोड्या अंतरावर धावत असतात. दरम्यान सध्या अशीच एक घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशनव घडली आहे. यामध्ये उल्हासनगर स्टेशन दोन ट्रेन एकाच रुळावर एकाच वेळी आल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही दर्घटना घडली नाही मात्र काहीवेळासाठी प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर दोन ट्रेन समोरामोर उभ्या आहेत. प्रवाशांचीही यामुळे तारांबळ उडाली आहे. अनेकांनी हे पाहून रुळावर उड्या मारल्या. दोन ट्रेन अगदी थोड्याच अंतावर एकाच रुळावर समोरासमोर उभ्या आहेत. हा गोंधळ कशामुळे आणि कसा झाला याबाबत अजूनही ठोस माहिती मिळाली नाहीये. मात्र या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार एक महिला ट्रेनमधून खाली पडल्यामुळे चैन खेचण्यात आली होती आणि त्यामुळे असा प्रकार घडला.  यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पोरी कुठली गं तू?” खानदेशी आजीच्या फॉरेनच्या सुनेबरोबर मराठीत गप्पा, VIDEO पाहून म्हणाल वाहह क्या बात…

याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या संदर्भात सिग्नल प्रणालीच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी हे कस झाले याची तपासणी करीत असून, यात नेमकं कोण दोषी की तांत्रिक बिघाड हे स्पष्ट होईल. मात्र रेल्वेचा वेग जास्त असता तर काय घडलं असतं याचा अंदाज देखील लावता येणार नाही. त्यामुळे यातील दोषींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar railway station incident of two trains facing each other on the same platform video goes viral srk
Show comments