Viral Post :- घरात काळ्या मुंग्यांचा वावर जाणवू लागला की, त्यांना घालवण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करण्यात येतात. या काळ्या मुंग्या जरी‌ चावत नसतील‌ तरीही त्या घरात नसाव्यात, असं आपल्यातील अनेकांना वाटतं. मुंगीला तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे; पण तुम्ही कधी मुंगीचा चेहरा जवळून पाहिला आहे का? तर आज व्हायरल‌ होणाऱ्या पोस्टमध्ये असंच काहीसं पाहायला‌ मिळालं. त्या पोस्टमध्ये मुंगीचा चेहरा अगदी जवळून दाखवण्यात आला आहे; जो बघून तुम्ही काही क्षणांसाठी थक्क व्हाल.

सोशल मीडियावर मुंगीचा अल्ट्रा क्लोज-अप फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो (MatrinsKitties ) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मायक्रो फोटोग्राफीच्या मदतीने मुंगीचा हा फोटो‌ काढण्यात आला आहे. त्यात मुंगीचे लाल डोळे आणि लवचिक अँटेना दिसत होते. मुंगीच्या चेहऱ्याच्या या फोटोने सर्वांनाच चकित करून सोडलं आहे. अगदी जवळून मुंगीचा चेहरा असा दिसतो, असं कुणालाही आजवर वाटलं नव्हतं. हा फोटो बघितल्यावर एका क्षणासाठी तुम्हीसुद्धा घाबरून जाल. तेव्हा तुम्हीही एकदा बघाच मुंगीचा हा व्हायरल सेल्फी.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा :- जंगलाच्या राजाशी भिडला! क्षणातच खतरनाक सिंहाने माणसाची मान धरली अन्…व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

नक्की बघा पोस्ट :-

मुंगीचा हा पोट्रेट फोटो जोश कूगलर या फोटोग्राफरने क्लिक केला‌ आहे; जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या फोटोचा अनुभव सांगताना जोश यांनी सांगितले की, हा फोटो काढणे खूप अवघड होते. सामान्य मायक्रो सेटअपपेक्षा मुंगीचा फोटो काढणं जास्त कठीण होतं. त्यासाठी फोटोग्राफरनं निकाॅन डी (Nikon d7500) कॅमेरा आणि लाओवा (Laowa 25mm) लेन्सचा वापर केला आहे, असं सांगण्यात येत आहे. मुंगीचा हा पोट्रेट फोटो अनेकांना चकित करून सोडेल. आकाराने लहान मुंगी खरंच जवळून एवढी भयानक दिसू शकते, असं कोणालाच वाटलं नसेल

Story img Loader