Ultraviolette Shockwave Launched In India: अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) भारतीय बाजारात शॉकवेव्ह नावाची पहिली ड्युअल-पर्पज इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली आहे. पहिल्या हजार ग्राहकांसाठी ही दुचाकी १.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. हलक्या वजनाच्या प्लॅटफॉर्मवर आधारित, रोड-लीगल ईव्ही ब्रँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर, टेसेरॅक्टसोबत (Tesseract) लाँच करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा ड्युअल-पर्पज (dual purpose) तिच्या बारीक डिझाइनद्वारे अधोरेखित होतो. ही बाईक आकर्षक डिझाइनसह येते, ज्यामध्ये उभ्या स्टॅक केलेल्या हेडलॅम्पसह ड्युअल-प्रोजेक्टर एलईडी लाईट्स आहेत. त्यात रॅली बाईकमध्ये दिसणाऱ्या सीटसाठी डिझाइन असलेला उंच हँडल बारदेखील आहे.

याव्यतिरिक्त बाईकमध्ये ऑफ-रोड हॅंडलिंग सुधारण्यासाठी हँडल बार दिल्याचे दिसते. तसेच ही गाडी इलेक्ट्रिक यलो विथ ब्लॅक व व्हाईट विथ रेड अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Ultraviolette Shockwave गुगल ट्रेंडवर होतेय सर्च

अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव्ह : रेंज (Ultraviolette Shockwave Range)

१२० किलो वजनाची अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव्ह एका चार्जवर १६५ किमीची IDC रेंज देते. त्यात १४ hp पॉवर निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. या सर्वांचा वापर अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव्हला २.९ सेकंदांत ० ते ६० किमी प्रतितास वेगाने प्रक्षेपित करण्यासाठी केला जाऊ शकतो; तर कमाल वेग १२० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.